इक्का’ चित्रपट निर्मात्यांचेदादासाहेब फाळके चित्रपट युनियनने केले अभिनंदन
इक्का’ चित्रपट निर्मात्यांचेदादासाहेब फाळके चित्रपट युनियनने केले अभिनंदन
मुंबई-: सनी देवल , अक्षय खन्ना अशी तगडी स्टारकास्ट घेऊन निर्मिती केलेल्या ‘इक्का’ ह्या हिंदी चित्रपटाला ओटीपी प्लॅटफॉर्मवर घवघवीत यश प्राप्त झाल्याबद्दल चित्रपटाचे निर्माते प्रेमकिशनजी प्रेमनाथ मल्होत्रा यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे वांद्रे पाली हिल इथल्या निवासस्थानी भेट देऊन ‘इक्का’ चित्रपटाच्या यशाबद्दल
दादासाहेब फाळके चित्रपट युनियनचे मुंबई अध्यक्ष देवेंद्र पंडित व त्यांच्या कन्या मिस दीपशिका पंडित यांनी प्रेमकिशनजी जी मल्होत्रा यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. दिग्दर्शक सिद्धार्थजी मल्होत्रा यांना चित्रपटाच्या यशाबद्दल भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत
नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिल्यामुळे कमी कालावधीतच हा पिक्चर लोकांच्या पसंतीस उतरल्याचे दिसून आले आहे.
१०.१ दशलक्ष तास हा चित्रपट पाहिला गेल्याने एक नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. असे कोईमोई डॉट कॉम या खाजगी वेबसाईटने जाहीर केले आहे. जगभरातील १६ देशांमध्ये हा सिनेमा फारच ट्रेडिंग राहिला आहे. २९ वर्षानंतर सनी देवल आणि अक्षय खन्ना ही जोडी पुन्हा एकदा ओटीपी प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घालायला सज्ज झाली आहे. यापूर्वी हे दोघेजण बॉर्डर या चित्रपटात एकत्र दिसले होते त्या चित्रपटाने 55 कोटीच कमाई देशभरात केली होती .
दादासाहेब फाळके चित्रपट युनियनचे मुंबई अध्यक्ष देवेंद्र पंडित हे गेल्या २ दशक भरापासून चित्रपट युनियन मध्ये कार्यरत आहेत सिने जगतात त्यांचे अनेक दिग्गज निर्माते दिग्दर्शक आणि कलाकार यांच्या सोबत जवळचे संबंध राहिले आहेत त्यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांच्या कन्या मिस दीपशिका पंडित या सुद्धा पडद्यामगून मोठी जबाबदारी पार पडत आहेत . फारच कमीवेळात त्यांनी उंच शिखर गाठून या क्षेत्रात स्वतःचे नाव कमावले आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर