विनापरवानगी जाहिरातींच्या तक्रारीसाठी टोल फ्री नंबर
- by
- Dec 23, 2020
- 2921 views
नवी मुंबई ः उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये विनापरवानगी बॅनर्स, पोस्टर्स तसेच होर्डिंग्ज लावून व भिंती रंगवून जाहिराती करु नयेत, तसेच झाडावर कोणत्याही जाहिराती लावून त्यांना इजा पोहचवू नये असे सर्व नागरिक,संस्था, मंडळे यांना पालिकेच्यावतीने सूचित करण्यात येत आहे. याचे उल्लंघन करणार्या संबधितांवर सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध कायदयांतर्गत फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये विनापरवानगी जाहिराती,होर्डिंग्ज,बॅनर्स, पोस्टर्स आढळल्यास त्याची माहिती नागरिकांनी महापालिकेस देण्यासाठी पुढील प्रमाणे टोल फ्री नंबर उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.
बेलापुर विभाग, शशिकांत तांडेल, 1800 222 312
नेरुळ, दत्तात्रय नागरे 1800 222 313
वाशी, महेश हंशशेट्टी 1800 222 315
तुर्भे, सुबोध ठाणेकर 1800 222 314
कोपरखैरणे, अशोक मढवी 1800 222 316
घणसोली, महेंद्रसिंग ठोके 1800 222 317
ऐरोली, मंगला माळवे 1800 222 318
दिघा, प्रियंका काळसेकर 1800 222 319
मुख्यालय 1800222309/1800222310
तरी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना विनापरवानगी जाहिराती, होर्डिंग्ज, बॅनर्स, पोस्टर्स आढळल्यास त्याची माहिती व छायाचित्रे 8422955912 या मोबाईल क्रमांकावर व्हॉटस अॅपदारे पाठवावीत असे आवाहन पालिकेने केले आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
18 DEC TO 24 DEC 2025...
- 24 December, 2025
27 NOV TO 3 DEC 2025 (25)
- 03 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya