पाकिस्तानात रात्री 8 नंतर लागणार लॉकडाऊन
पाकिस्तानात रात्री 8 नंतर लागणार लॉकडाऊन
इस्लामाबाद - पाकिस्तान सरकारने इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर देशभरात ‘स्मार्ट लॉकडाऊन’ लागू केला आहे. यानुसार बाजारपेठा, शॉपिंग मॉल्स व व्यावसायिक केंद्रे रात्री ८ वाजता बंद होतील, तर रेस्टॉरंट्स व खाद्यगृहे रात्री १० वाजेपर्यंत चालू राहतील. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर ही घोषणा केली आहे. पाकिस्तान रेडिओनुसार, शहबाज सरकारने पंजाब, खैबर पख्तुनख्वा, बलुचिस्तान, इस्लामाबाद राजधानी क्षेत्र, गिलगिट-बाल्टिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीर (पीओके) येथील बाजारपेठा, शॉपिंग मॉल्स आणि व्यावसायिक क्षेत्रे रात्री 8 वाजता बंद करण्याचा निर्णय घेतलाय.
शहबाज सरकारने प्रांतिक सरकारशी सल्लामसलत करून हा निर्णय घेतला आहे. खैबर पख्तुनख्वाच्या विभागीय मुख्यालयांमधील बाजारपेठा आणि शॉपिंग मॉल्स रात्री 9 वाजेपर्यंत उघडे राहतील. तर सर्व जनरल स्टोअर्स, डिपार्टमेंट स्टोअर्स आणि सर्व प्रकारचे मॉल्स रात्री 8 वाजता बंद होणार आहेत.
त्याशिवाय, बेकरी, रेस्टॉरंट आणि इतर खाद्यपदार्थांची दुकाने, तसंच विवाह सभागृह, तंबू आणि लग्न, इतर कार्यक्रमांचे आयोजन करणारी इतर व्यावसायिक ठिकाणे रात्री 10 नंतर बंद होणार आहे. तसंच या बैठकीत निर्णय घेण्यात आला की, रात्री 10 नंतर खाजगी मालमत्ता आणि घरांमध्ये होणाऱ्या विवाह समारंभांवर बंदी असणार आहे. पण, वैद्यकीय दुकाने आणि औषध दुकाने या निर्बंधांमधून त्यांच्या समावेश नसणार आहे. हे निर्बंध मंगळवारपासून म्हणजेच आज रात्री 8 वाजल्यापासून पाकिस्तानात स्मार्ट लॉकडाउन म्हणून घोषित करण्यात आला आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
24 SEPT TO 30 SEPT 2026...
- 24 September, 2026
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
सेलिब्रिटी बर्थडे
मंत्री मा.ना. छगनराव भुजबळ
- जन्मदिन
- October 15
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर