15 ऑगस्टला 1 लाख 10 हजार रिक्षा, ओला-उबर चालकांना प्रमाणपत्र
15 ऑगस्टला 1 लाख 10 हजार रिक्षा, ओला-उबर चालकांना प्रमाणपत्र
मुंबई -: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज पत्रकार परिषद घेत अमराठी भाषिकांसाठी राबविण्यात येत असलेल्या ‘शिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा कार्यशाळा अभियानाची’ माहिती दिली.
मराठी साहित्यिक अभियानाच्या माध्यमातून राज्यातील लाखो रिक्षाचालक तसेच ओला-उबर चालकांना मराठी भाषा शिकविण्याचा उपक्रम राबविण्यात आला आहे. या अभियानांतर्गत 15 ऑगस्ट रोजी तब्बल 1 लाख 10 हजार नागरिकांना मराठी भाषा शिकल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याची माहिती मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
या उपक्रमासाठी मुंबई आणि कोकण मराठी साहित्य परिषद संघाचे त्यांनी अभिनंदन केले. ठाण्यातून या अभियानाची सुरुवात करण्यात आली असून, RTO अधिकारी हेमांगी पाटील यांच्या माध्यमातून अमराठी भाषिकांसाठी हा उपक्रम पुढे नेण्यात आला. तसेच प्रदीप धवल यांनी राज्यातील 33 जिल्ह्यांमध्ये या अभियानासाठी सहकार्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केल्याचे सरनाईक यांनी सांगितले.
विदर्भासह राज्यातील काही भागांमध्ये मराठी भाषिक नागरिकही आपसात हिंदी भाषेत संवाद साधतात. त्यामुळे केवळ अमराठी भाषिकांपुरते मर्यादित न ठेवता, रिक्षाचालक, ओला-उबर चालक आणि सर्वसामान्य नागरिकांना मराठी भाषेचा वापर करता यावा, या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मराठी भाषा शिकण्यास आणि तिचा दैनंदिन व्यवहारात वापर वाढविण्यासाठी हे अभियान महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade