RSS च्या कार्यक्रमाला सलमान खानची उपस्थिती
RSS च्या कार्यक्रमाला सलमान खानची उपस्थिती
मुंबई - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षांनिमित्त मुंबईमध्ये आयोजित एका कार्यक्रमात भाईजान म्हणून प्रसिद्ध असलेला बॉलिवूड अभिनेता सलमान खान उपस्थित राहिल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. मुंबईतील विविध क्षेत्रातील निमंत्रित करण्यात आलेल्या मान्यवरांना आरएसएसचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी नवे क्षितिज या व्याख्यानमालेतून संबोधित केले. वरळीच्या नेहरु सेंटर सभागृहात या दोन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. संघासारख्या हिंदुत्ववादी संघटनेच्या व्यासपीठावर देशातील एका मोठ्या मुस्लिम सुपरस्टारचं उपस्थित राहणं हे सामाजिक आणि राजकीय दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे. संघाच्या या कार्यक्रमाला अभिनेता सलमान खान सह भाऊ कदम, प्रसाद ओक यांनीही हजेरी लावली होती.
मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात म्हणाले की, आपण जागतिक नेते बनू पण विश्वगुरू भाषणांनी नव्हे तर उदाहरणांद्वारे बनू. जर तुम्ही भारतातील असाल, तर हा स्वभाव तुमच्यात आहे. मुस्लिम आणि ख्रिश्चन हे भारतातील आहेत. भारतात चार प्रकारचे हिंदू आहेत. पहिले – जे अभिमानाने म्हणतात की आम्ही हिंदू आहोत. दुसरे: जर आपण हिंदू आहोत, तर आपण आहोत, अभिमान बाळगण्यासारखे काय आहे? तिसरे – हळूवारपणे सांगा, आम्ही हिंदू आहोत. जर तुम्ही घरी येऊन विचारले तर आम्ही तुम्हाला सांगू. चौथे: जे विसरले आहेत, ज्यांना विसरले गेले आहे. अधिक लोकांना विसरावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी पूर्तीनिमित्त ‘नवे क्षितिज’ या नावाने एक विशेष व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्राला दिग्दर्शक सुभाष घई, अभिनेत्री हेमा मालिनी, अश्विनी भावे आणि सुनील बर्वे यांसारख्या सिनेसृष्टीतील दिग्गजांनी आपली उपस्थिती दर्शवली. मात्र, या सर्व मान्यवरांमध्ये बॉलीवूडचा ‘भाईजान’ अर्थात अभिनेता सलमान खान याची उपस्थिती सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. सलमान खानने या कार्यक्रमाला हजेरी लावताच उपस्थितांच्या भुवया उंचावल्या आणि सर्वांचे लक्ष त्याच्याकडे वेधले गेले. एका अर्थाने, या वैचारिक व्यासपीठावर सलमान खान ‘शो स्टॉपर’ ठरला.
अभिनेते प्रसाद ओक यांनी यावेळी बोलताना म्हटले की, शताब्दी पूर्तीनिमित्त या कार्यक्रमाला उपस्थित होतो. त्यांचे अविस्मरणीय बोल ऐकण्यात आले. राष्ट्राप्रति विचार हे मोलाचे आहेत, खूप काही देऊन जाणारे आहेत. भारत म्हणजे भूगोल नाही भारत विचार आहेत. सलमान खान आले माझ्या साठी खूप शॉकिंग होत. पण हे आदरपूर्ण आहेत, त्यांनी निमंत्रणाला सन्मान दिला आहेत आणि असे येणं जाणं असायला पाहिजे. त्यामुळे सार्वभौम विचार वाढेल.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
24 SEPT TO 30 SEPT 2026...
- 24 September, 2026
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर