आता विद्यार्थीही SIR ड्यूटीवर
आता विद्यार्थीही SIR ड्यूटीवर
मुंबई-: राज्यातील मतदारयादी विशेष सखोल पडताळणी अर्थात SIR चे काम आटोपता आटपोना झाले आहे. या कामासाठी हजारो शिक्षक कार्यरत असल्याने शालेय अभ्यासक्रम मागे पडून विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आता मुंबईत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मदत घेतली जाणार आहे. विलेपार्ले पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकाऱ्यांच्या मागणीनंतर, मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने प्राचार्यांना पत्र पाठवून प्रत्येक महाविद्यालयातून २५ स्वयंसेवक देण्याचे निर्देश दिले आहेत. या कामासाठी विद्यार्थ्यांना ‘ऑन द जॉब ट्रेनिंग’ प्रमाणपत्र आणि मानधन दिले जाणार आहे.
आता SIRचा पहिला टप्पा पूर्ण होत असताना ‘BLO’नी घरोघरी जाऊन गोळा केलेल्या माहितीचे डिजिटल संकलन करण्यासाठी निवडणूक आयोगाला अतिरिक्त मनुष्यबळाची गरज पडत आहे. हे मनुष्यबळ विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या मदतीने उभारण्यात येणार आहे.
‘एसआयआर’च्या कामात विद्यार्थ्यांना समाविष्ट करण्याची विनंती आम्ही महाविद्यालयांना केली. काम मोठे असून हे विद्यार्थी ‘बीएलओं’ना साहाय्यक म्हणून काम करत आहेत. त्यासाठी आम्ही त्यांना संबंधित तासांचे प्रमाणपत्र देणार असून ते त्यांच्या शैक्षणिक कामगिरीत उपयोगी पडणार आहे. या कामासाठी कोणालाही सक्ती करण्यात आलेली नसून विद्यार्थ्यांनी स्वयंप्रेरणेने यात सहभाग घेतला आहे. – डॉ. प्रियांका पाटील, निवडणूक निर्णय अधिकारी, विलेपार्ले पूर्व मतदारसंघ
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
24 SEPT TO 30 SEPT 2026...
- 24 September, 2026
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade