राजुल संजय पाटील यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
राजुल संजय पाटील यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
मुंबई – युवासेना कार्यकारीणी सदस्य राजुल संजय पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यापुर्वी त्यांनी ११४ वार्ड मध्ये जाऊन स्वामी समर्थ महाराजांच्या मठात तसेच
गणेश मंदीरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर मुलुंड पश्चिम येथील कालिदास नाट्यगृहात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील आणि विभाग प्रमुख रमेश कोरगावकर व हजारो शिवसेना व मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांपासून भांडुप पश्चिमेकडील ११४ वार्ड मध्ये कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत चर्चा चालू होत्या. या चर्चांना काल पुर्णविराम मिळाला जेव्हा राजुल संजय पाटील यांना मातोश्री येथे शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी एबी फॉर्म दिला. उमेदवारी निश्चित झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. आज सकाळी ११ वाजता राजुल पाटील यांनी हजारो कार्यकर्त्यांसह भांडुप ११४ वॉर्ड मध्ये जाऊन श्री स्वामी समर्थ महाराजांचे तसेच मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी मुलुंड कालिदास नाट्यगृह येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर पत्रकारांशी बोलतांना सांगितले की पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी माझ्यावर विश्वास दाखवत मला निवडणूक लढविण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. या विभागातील समस्या दूर करण्यासाठी जास्तीत जास्त काम करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच भांडुप रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या अपघातात नाहक बळी गेलेल्या नागरिकांना त्यांनी श्रध्दांजली वाहली व अशा घटना परत घडू नये यासाठी काळजी घेण्यात येईल असा शब्द दिला. तसेच हा डेपो ड्रीम्स मॉल किंवा भांडुप रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या पार्किगच्या जागेवर हलविण्यात यावा अशी मागणी खासदार संजय दिना पाटील यांनी केली.
असल्याचे राजुल पाटील यांनी पत्रकारांना सांगितले. या निवडणुकीत आपला विजय निश्चित असून आतापासूनच सर्व कार्यकर्ते तसेच ११४ वॉर्ड मधील नागरीकांनी पाठिंबा देण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे या वॉर्ड मधून भरघोस मतांनी विजयी होणारच असा विश्वास राजुल संजय पाटील यांनी व्यक्त केला.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
18 DEC TO 24 DEC 2025...
- 24 December, 2025
27 NOV TO 3 DEC 2025 (25)
- 03 December, 2025
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade