केदारनाथ मंदीर प्रवेशासाठी गैरहिंदूंना द्यावे लागणार सनातनी असल्याचे प्रतिज्ञापत्र
केदारनाथ मंदीर प्रवेशासाठी गैरहिंदूंना द्यावे लागणार सनातनी असल्याचे प्रतिज्ञापत्र
रुद्रप्रयाग - उत्तराखंडातील बद्रीनाथ–केदारनाथ मंदिर समितीने (BKTC) नवा नियम लागू केला आहे. या नियमानुसार गैरहिंदूंना मंदिरात प्रवेश करण्यासाठी ‘मी सनातनी आहे’ असे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार आहे. या निर्णयामुळे बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान चर्चेत आली आहे कारण ती बाबा केदारनाथाची भक्त असून अनेकदा दर्शनासाठी जात असते. आता तिला देखील केदारनाथाच्या दर्शनासाठी आता असे प्रतिज्ञापत्र आवश्यक ठरणार आहे.
BKTC अध्यक्ष हेमंत द्विवेदी यांनी जाहीर केले की गैरहिंदू भाविकांना बद्रीनाथ व केदारनाथ मंदिरात प्रवेशासाठी सनातनी असल्याचे लिखित प्रतिज्ञापत्र द्यावे लागेल. या प्रतिज्ञापत्रात भाविकांनी स्पष्टपणे नमूद करावे लागेल की ते सनातन धर्माचे अनुयायी आहेत. हा नियम चारधाम यात्रेच्या हंगामापूर्वी लागू करण्यात आला असून सरकारकडून त्याची समीक्षा सुरू आहे.
या निर्णयावरून ‘धर्मनिष्ठा व परंपरा विरुद्ध धार्मिक स्वातंत्र्य’ असा वाद सुरू झाला आहे. काहींचे मत आहे की मंदिरात प्रवेशासाठी श्रद्धा महत्त्वाची असली तरी प्रतिज्ञापत्राची सक्ती ही धार्मिक स्वातंत्र्याला बाधक ठरू शकते.
सनातनी असल्याचे ‘कोण प्रमाणित करणार?’ हा प्रश्नही उपस्थित झाला आहे, कारण प्रतिज्ञापत्राची सत्यता तपासण्याची प्रक्रिया अस्पष्ट आहे.
केदारनाथ व बद्रीनाथ मंदिरात गैरहिंदूंना प्रवेशासाठी सनातनी असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा BKTC चा निर्णय हा धार्मिक परंपरा जपण्याचा प्रयत्न मानला जातो. मात्र यामुळे धार्मिक स्वातंत्र्य, सामाजिक सलोखा आणि राजकीय वाद यांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant