अनधिकृत पार्किंग केलेल्या वाहनांमुळे पादचारी हैराण
अनधिकृत पार्किंग केलेल्या वाहनांमुळे पादचारी हैराण
भायखळा पश्चिम येथील रेल्वे स्थानकासमोर रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात दुचाकी आणि चारचाकी वाहनाची बेकायदा पार्किंग केल्यामुळे नागरिकांना आणि पादचार्यांना रस्त्यावरून चालताना फार त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी नागरिकांना रोडवरून चालावे लागत असल्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे. ना म जोशी येथील मागील रोड हा अतिशय अरुंद असून या रोडवरून चालणे आधीच खडतर आहे. येथे अनेक इमारती असल्याने बाहेरील वाहनचालक देखील येथे अनधिकृत पार्किंग करत असतात. त्यामुळे पादचार्यांना आणि स्थानिक रहिवाश्यांना पदपथावरून चालण्यास जागाच नसल्याने परिणामी त्यांना रोडवरून चालावे लागते. रोडवरून चालताना गाड्यांचा अंदाज न आल्यामुळे येथे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. या अनधिकृत वाहनाच्या पार्किंगमुळे पादचार्यांच्या अपघातात प्रचंड वाढ झाली आहे. याच रोडवर पुढे शाळा असल्याने विभागाचे कार्यालय असल्यामुळे येथे अनेक विद्यार्थी देखील ये जा करत असतात.तसेच अनेक वयस्कर नागरिकही मोठ्या प्रमाणात ये जा करत असतात. परंतु रोडवर चालण्यामुळे एखादा अपघात घडल्यास त्यास जबाबदार कोण असा प्रश्न स्थानिक रहिवाशी विचारत आहे. तरीही वाहतूक विभाग अशा बेकायदा पार्किंग केलेल्या वाहनावर काहीच कारवाई करत नाही. तसेच ती वाहने टोइंगद्वारे उचलली जात नसल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये आणि खाजगी कंपनीतील कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. आम्ही वारंवार वाहतूक विभागाशी पदपथ आणि रस्त्यालगची वाहने उचालाण्यासंदर्भात अनेक वेळा पत्रव्यवहार केले परंतु आश्वासनाच्या पलीकडे काहीच कारवाई करण्यात आली नाही. तरी त्वरित वाहतूक नियंत्रण विभागाने या पदपथा समोरील आणि रस्त्यालगची पार्किंग केलेली वाहने त्वरित उचलावी आणि पदपथ नागरिकांसाठी मोकळे करावी अशी मागणी स्थानिक रहिवाशी आणि कार्यालयीन कर्मचारी करत आहेत.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant