यामिनी जाधव यांचा मुंबई पालिका निवडणुकीसाठी प्रचाराला वेग
यामिनी जाधव यांचा मुंबई पालिका निवडणुकीसाठी प्रचाराला वेग
मुंबई – सामाजिक कार्यकर्त्या यामिनी जाधव या 2026 च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार म्हणून रिंगणात असून त्यांचा प्रचार जोरदार सुरु झाला आहे. खंद्या आणि जिद्दी कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जाधव यांनी मागील कार्यकाळातील कामाच्या जोरावर मतदारांचे लक्ष वेधून घेतले आहे.
जाधव यांनी 2022 ते 2027 या काळात मुंबई महानगरपालिकेत नगरसेविका म्हणून काम पाहिले तर 2019 ते 2014 या कालावधीत त्या महाराष्ट्र विधानसभेत आमदार होत्या. या काळात अनेक विकासकामांचा त्यांनी अनुभव घेतला असून सामाजिक कार्यकर्ते यशवंत जाधव यांच्या कामाचा आणि अनुभवाचा मोठा फायदा त्यांना झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
“शब्दांपेक्षा कामाला अधिक ताकद असते आणि आश्वासनांपेक्षा लोकांची खरी सेवा अधिक परिणामकारक ठरते,” असा ठाम विश्वास व्यक्त करत जाधव म्हणाल्या की हा विश्वास त्यांनी कामातूनच सिद्ध केला आहे. भायखळा विधानसभा प्रभागात केलेल्या विविध कामांमुळे त्यांची ओळख मजबूत झाली असून यंदा जनमत आपल्या बाजूने असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जाधव म्हणाल्या, “यापुढेही माझ्या शब्दांपेक्षा माझे कामच अधिक बोलेल.” 2026 च्या निवडणुकीत मतदार त्यांच्या कामगिरीला किती प्रतिसाद देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
कामाचा धडाका
यामिनी जाधव यांनी विविध स्तरांवर खालीलप्रमाणे कामे केली –
पायाभूत सुविधा व शहरी विकास
-
माजगाव येथे साडेचार टन ब्रॉन्झपासून तयार केलेला वीर शिरोमणी महाराणा प्रतापांचा भव्य पुतळा व चौकाचे सुशोभीकरण
-
जोसेफ बाप्टिस्टा उद्यानाचे पुनरुज्जीवन
कोविड-19 काळातील पुढाकार
-
भायखळा जंबो कोविड सेंटरमध्ये 100 आयसीयू बेड व 100 व्हेंटिलेटर वाढविण्याची मागणी यशस्वीरित्या पूर्ण
-
नागरिकांना धान्य, जीवनावश्यक वस्तू व रोगप्रतिकारक औषधांचा पुरवठा
-
प्रशासनाबरोबर सतत समन्वय व तातडीची कार्यवाही
महिला सक्षमीकरण
-
महिलांना 55 फूड ट्रकचे वितरण
-
4000 शिलाई मशीन व घरघंटीचे वाटप
-
सुरक्षित बाळंतपणासाठी 1 रुपयात 10 सॅनिटरी नॅपकिन्स देण्याची विधानसभेत मागणी व ती पूर्ण
-
हिरकणी कक्ष योजना राज्यभर राबविण्यात आली
युवक सक्षमीकरण
-
प्रभागात दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा
-
बेरोजगार युवकांना झेरॉक्स मशीनचे वाटप
-
विद्यार्थ्यांना लॅपटॉप, टॅब, संगणक वाटप
-
संगणक प्रशिक्षण वर्गांची सुरुवात
-
फिरते वाचनालय उपक्रम सुरू
ज्येष्ठ नागरिक व सामाजिक उपक्रम
-
ज्येष्ठ नागरिक केंद्र व डे-केअर सेंटरची उभारणी
-
निराधार व अनाथांना मदत
-
पावसाळ्यात छत्री व हिवाळ्यात ब्लँकेटचे वाटप
विद्यार्थ्यांपासून महिलांपर्यंत, युवकांपासून ज्येष्ठांपर्यंत समाजातील सर्व स्तरात त्यांच्या कामाची ठसा उमटल्याचे स्थानिक पातळीवर दिसून येत आहे.
पुरस्कार आणि मान्यता
यामिनी जाधव यांच्या कार्याची दखल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेऊन त्यांना उत्कृष्ट भाषण पुरस्काराने सन्मानित केले. तसेच नवराष्ट्र वृत्तपत्र समूहाकडून ‘आदर्श आमदार पुरस्कार’, तर दैनिक सांज महानगरी यांच्या वतीने ‘सेवाव्रती महिला पुरस्कार – 2024’ देऊन गौरविण्यात आले.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade