10 वी भूगोलाच्या 50 प्रश्नपत्रिकांचा संच चोरीला
10 वी भूगोलाच्या 50 प्रश्नपत्रिकांचा संच चोरीला
सांगोला - दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचे पेपर सुरक्षित ठेवणारी ‘स्ट्राँग रूम’ फोडून भूगोलाच्या 50 प्रश्नपत्रिकांचा संच चोरून नेल्याची धक्कादायक घटना सांगोला विद्यामंदिर प्रशालेत उघडकीस आली आहे. गुरूवारी होणाऱ्या भूगोलाच्या पेपरच्या गोपनीयतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण असून, आता बोर्ड काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्या पेपर असतानाच अशा प्रकारची घटना घडल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे आणि संभ्रमाचे वातावरण आहे. परीक्षेच्या गोपनीयतेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने शिक्षण विभागाच्या कारभारावरही टीका होत आहे.
दहावीच्या परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या प्रश्नपत्रिका सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, रात्रीच्या सुमारास अज्ञातांनी या रूमचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटातील भूगोलाच्या प्रश्नपत्रिकांचे 50 प्रश्नपत्रिका लंपास करण्यात आल्या आहेत. शनिवारी सकाळी जेव्हा केंद्रावरील कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात आली, तेव्हा एकच धावपळ उडाली. स्ट्राँग रूमसारख्या ठिकाणी ही चोरी झाल्याने शिक्षण मंडळाच्या सुरक्षा व्यवस्थेचे वाभाडे निघाले आहेत.
घटनेच्या वेळी स्ट्राँग रूमसमोरील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे समोर आले आहे. चोरट्यांनी नियोजनबद्धरीत्या हे कृत्य केल्याचा संशय आहे. तसेच, ड्युटीवर असलेला कर्मचारी त्यावेळी नेमका कुठे होता, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.
सकाळी शिक्षण विभाग आणि कस्तोडियन हे कालचे उरलेले पेपर बोर्डाकडे पोस्टात टाकण्यासाठी आले असता स्ट्रॉंग रूमचे कुलूप तोडल्याचे दिसून आले.
प्रश्नपत्रिका चोरीला गेल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, प्रश्नपत्रिका चोरीला गेल्यामुळे हा पेपर रद्द होणार की नवीन प्रश्नपत्रिका संच पुरवले जाणार, याबाबत शिक्षण मंडळाने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर