मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यक्षपदी पुन्हा शरद पवार
मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यक्षपदी पुन्हा शरद पवार
मुंबई -मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सर्वसाधारण सभेत संस्थेच्या अध्यक्षपदी शरद पवार यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. त्याचबरोबर सात उपाध्यक्ष आणि पंधरा कार्यकारिणी सदस्यांचीही बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी किरण सोनवणे यांनी जाहीर केले. उमा नाबर यांची कार्याध्यक्षपदी, मारुती नांदविस्कर कार्योपाध्यक्ष, रवींद्र गावडे प्रमुख कार्यवाह, जयवंत गोलतकर व सतीश राणे यांची कोषाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.
संस्थेच्या सर्वसाधारण सभेची निवडणूक १५ मार्च रोजी झाली होती. त्यात जिंकलेले ४० सदस्य अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच कार्यकारिणी सदस्यांची निवड करतात. शरद पवार यांचाच एकमेव अर्ज आला होता. त्याचप्रमाणे उपाध्यक्षपदाच्या सात जागांसाठी मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर, नामवंत वास्तुविशारद शशी प्रभू, डॉक्टर प्रदीप कर्णिक, माजी आमदार विद्या चव्हाण, पत्रकार व जनता दलाचे मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर, गणराज सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष महेश पवार व विनायक परब यांचे अर्ज आले होते.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर