खरात प्रकरणातील महत्त्वाच्या साक्षीदाराचा अपघाती मृत्यू
खरात प्रकरणातील महत्त्वाच्या साक्षीदाराचा अपघाती मृत्यू
छत्रपती संभाजीनगर - अनेक महिलांचे शोषण करणारा नाशिकमधीव भोंदू बाबा अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉक्टर जितेंद्र शेळके यांचा आज अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या कारने समृद्धी महामार्गावर उभ्या असणाऱ्या एका कंटेनरला मागच्या बाजूने जोरदार धडक दिली. त्यात जितेंद्र शेळके यांच्यासह त्यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला.
जितेंद्र शेळके यांची अशोक खरात प्रकरणात चौकशी सुरू होती. SIT ने त्यांचा जबाबही नोंदवला होता. ते या प्रकरणातील एक महत्त्वाचे साक्षीदार होते. त्यामुळे त्यांचा मृत्यू अपघात की घातपात? याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत.
जितेंद्र शेळके आज दुपारी 1 च्या सुमारास आपल्या कुटुंबासह छत्रपती संभाजीनगरहून शिर्डीच्या दिशेने जात होते. रस्त्यात समृद्धी महामार्गावरील धोत्रे गावालगत त्यांच्या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या एका कंटेनरला मागच्या बाजूने जोरदार धडक दिली. त्यात जितेंद्र शेळके व त्यांची पत्नी अनुराधा हे दोघे जागीच ठार झाले. तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला. ही धडक एवढी भीषण होती की, त्यांची कार थेट कंटेनरखाली घुसली. त्यामुळे तिचा अक्षरशः चुराडा झाला. जखमी मुलाला लगतच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant