भारत-चीन दरम्यान सहा वर्षांनंतर व्यापार सुरू
भारत-चीन दरम्यान सहा वर्षांनंतर व्यापार सुरू
नवी दिल्ली-: कोविड-19 महामारीच्या काळात सीमेवरील तणावामुळे पूर्णपणे बंद झालेला व्यापार आता पुन्हा सुरू झाला आहे. 1 ऑगस्ट रोजी भारत आणि चीनमध्ये सिक्कीममध्ये असलेल्या नाथुला खिंडीतून सीमा व्यापार सहा वर्षांनी पुन्हा सुरू झाला. हा व्यापार पूर्व सिक्कीममधील नाथू ला खिंड आणि उत्तराखंडमधील लिपुलेख खिंडीतून सुरू झाला.
यापूर्वी भारताच्या नाथू ला खिंडीतून जाणारा जुना रेशीम मार्ग जुलै 2006 मध्ये पुन्हा उघडण्यात आला होता. यामुळे दोन्ही देशांच्या नाथू ला खिंडीच्या आसपासच्या प्रदेशात आर्थिक समृद्धी आणण्यास मदत मिळेल अशी अपेक्षा होती.
नाथू ला खिंडीतून जाणारा सीमा व्यापार अधिकृतपणे दरवर्षी मे ते नोव्हेंबरपर्यंत सुमारे सहा महिन्यांसाठी खुला असतो. दोन देशांदरम्यान हा व्यापार आठवड्यातून सोमवार ते गुरुवारपर्यंत सुरू राहील.
या वर्षी पहिल्या टप्प्यात 38 नोंदणीकृत स्थानिक व्यापाऱ्यांना पास देण्यात आले आहेत, जे हस्तकला आणि हातमाग उत्पादनांसह सुमारे 36 मंजूर वस्तूंची आपसात देवाणघेवाण करतील. यासोबतच, सुमारे सहा वर्षांनंतर हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यात शिपकी-ला मार्गे भारत आणि चीन यांच्यातही सीमापार व्यापार पुन्हा सुरू झाला आहे. 1962 नंतर 6 जुलै 2006 रोजी, म्हणजेच 44 वर्षांनंतर, दोन्ही देशांदरम्यान व्यापारासाठी सीमा उघडण्यात आली होती.
भारत-चीन व्यापार पुन्हा सुरू झाल्यामुळे भारतीय उद्योगांना कच्चा माल, तंत्रज्ञान व बाजारपेठ मिळाली आहे, ज्यामुळे उत्पादन, रोजगार आणि जागतिक स्पर्धात्मकता वाढेल. मात्र, दीर्घकालीन संतुलनासाठी भारताने उच्च मूल्यवर्धित निर्यात वाढवणे आणि व्यापार तूट कमी करणे आवश्यक आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant