भिवंडीत धोकादायक चार मजली इमारत कोसळली, नऊ जणांचा मृत्यू
भिवंडीत धोकादायक चार मजली इमारत कोसळली, नऊ जणांचा मृत्यू
ठाणे -: भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात नारपोली गंगाराम वाडी येथील कोहिनूर अपार्टमेंट ही धोकादायक म्हणून घोषित करण्यात आलेली चार मजली इमारत गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकून नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.
कोहिनूर अपार्टमेंट ही 2007 मध्ये बनवण्यात आली असून, या इमारतीमध्ये दोन विंग आहेत. प्रत्येक विंगमध्ये 15 अशा एकूण 30 सदनिका या इमारतीमध्ये होत्या. मात्र महापालिकेने ही इमारत धोकादायक घोषित केली होती. या इमारतीच्या एका विंगच्या तळमजल्यावर काही पिलर नादुरुस्त झाल्याने त्याची दुरुस्ती केली जात असल्याने सायंकाळी सहा वाजतापासूनच इमारतीला तडे जाण्यास सुरुवात झाली होती.
रात्री आठ वाजता इमारत एका बाजूने झुकत असल्याने पालिका प्रभाग समिती क्रमांक चारचे सहाय्यक आयुक्त अरविंद घोगरे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होत इमारत निर्मनुष्य केली होती. मात्र त्यानंतरही तळमजल्यावरील दुरुस्ती काम सुरू राहिल्याने व काही कुटुंबातील व्यक्ती साहित्य घेण्यासाठी इमारतीमध्ये आल्याने दुर्घटना घडल्यानंतर या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आठ ते दहा जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात होती.
महापालिका अग्नीशमन दल, NDRF आणि पोलीस तसेच इतरांच्या सहाय्याने रात्रीपासूनच बचाव कार्य सुरू करण्यात आले होते, अखेर नऊ जणांचे मृतदेह हाती लागले असून त्यातील दोघांची ओळख पटलेली नाही. या अपघातात बचावलेल्या लोकांवर उपचार सुरूआहेत. दरम्यान “भिवंडीत इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या प्रकरणात तत्काळ गुन्हा दाखल करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, असे आदेश महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत,” अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant