या शहरांत सुरू होणार BSNL 5G सेवा
या शहरांत सुरू होणार BSNL 5G सेवा
मुंबई - BSNL 5G पुढील सहा महिन्यांत लाँच होणार आहे, कंपनीचे सीएमडी रॉबर्ट रवी यांनी दिल्लीतील AI समिटमध्ये ही माहिती दिली आहे. BSNL चे CMD रॉबर्ट रवी यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, कंपनी आपली 5G सेवा सुरू करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. याची सुरुवात राजधानी दिल्लीपासून होईल. ते म्हणाले की, हे लाँच विद्यमान 4G इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेड करण्यावर आधारित असेल. मुंबई आणि दिल्लीसह जयपूर, लखनौ, चंदीगड, भोपाळ, कोलकाता, पटना, हैदराबाद आणि चेन्नई या शहरांमध्ये BSNL 5G टप्प्याटप्याने सुरू केले जाईल.
खासगी ऑपरेटर्सच्या स्पर्धेत स्वत:ला भक्कमपणे स्थापित करणे हे BSNL चे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासाठी भारत नेटच्या माध्यमातून ग्रामीण भागात एज AI तयार केले जात आहे. या माध्यमातून केवळ शहरीच नव्हे तर ग्रामीण भागातही हाय-स्पीड इंटरनेट आणि उत्तम कनेक्टिव्हिटी उपलब्ध होईल.
रॉबर्ट रवी म्हणाले की BSNL आता अशा पातळीवर पोहोचली आहे जिथे खासगी कंपन्या आणि BSNL यांच्यात फारसा फरक शिल्लक राहिलेला नाही. ते म्हणाले की, आगामी काळात AI बेस्ड नेटवर्क मॉनिटरिंगमुळे युजर्सना कोणत्याही व्यत्ययाशिवाय चांगल्या सेवा मिळू शकतील.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant