चार पिढ्यांच्या स्वरांतून साकारतंय गुरु-शिष्य परंपरेचं ‘अर्पण ‘
चार पिढ्यांच्या स्वरांतून साकारतंय गुरु-शिष्य परंपरेचं ‘अर्पण ‘
ठाणे -: भारतीय शास्त्रीय संगीताची समृद्ध परंपरा जपत गुरु-शिष्य नात्यातील संस्कारांची वीण, पुढील पिढीपर्यंत पोहोचवणाऱ्या ‘गुरुकुल प्रतिष्ठान’ तर्फे ‘अर्पण’ या विशेष सांगीतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं आहे. प्रख्यात बासरीवादक पं. विवेक सोनार यांच्या मार्गदर्शनाखाली रंगणाऱ्या या मैफलीत १५० हून अधिक शिष्य आपली कला सादर करणार आहेत. शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे हा कार्यक्रम रंगणार आहे
‘अर्पण’ हा केवळ सांगीतिक कार्यक्रम नसून गुरूंप्रती कृतज्ञता, संगीताप्रती समर्पण आणि भारतीय संगीत परंपरेविषयी आदरभाव व्यक्त करणारा सोहळा आहे. गुरुने दिलेली विद्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवताना त्यात आपले योगदानही अर्पण करण्याची भावना या उपक्रमामागे आहे. त्यामुळे गुरु-शिष्य परंपरेतील नात्याचे विविध पैलू या कार्यक्रमातून उलगडणार आहेत. ‘अर्पण’ मध्ये विवेक सोनार यांचे गुरु , जगविख्यात बासरीवादक पंडीत हरिप्रसाद चौरसिया यांचा गुरुपूजन सोहळा होणार आहे ‘अर्पण’मध्ये ‘बासरी रंग’ या विशेष सादरीकरणातून पं. विवेक सोनार यांचे 3 पिढीतील 150 हुन अधिक शिष्य परिवार, सिनेसंगीतांसह विविध रागांची सुरेल गुंफण सादर करतील. या सादरीकरणाला किरण वेहले, गौरव मुरकर, सचिन नखवा, रोहित देव आणि रवी नवले यांची साथ लाभणार आहे.
याशिवाय डॉ. हिमांशू गिंडे आणि नील सोनार यांचं एकल बासरीवादन होणार आहे. भारतीय बासरीवादनाची परंपरा, शास्त्रीय संगीताची बैठक आणि समकालीन सादरीकरणाचा आविष्कार या निमित्तानं अनुभवता येणार येईल. कार्यक्रमाची सांगता पं. विवेक सोनार यांचे बासरीवादनाने होणार असून त्यांना सुविख्यात पं. मुकुंदराज देव यांची तबला साथ लाभणार आहे.
भारतीय शास्त्रीय संगीताची गुरुकुल परंपरा केवळ जपण्याबरोबर ती नव्या पिढीच्या मनात रुजवण्याचा प्रयत्न या उपक्रमातून होत आहे. कार्यक्रमाच्या विनामूल्य प्रवेशिका गडकरी रंगायतन येथे उपलब्ध असून संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सुरेल सोहळ्याचा आनंद घ्यावा, असं आवाहन गुरुकुल प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant