Breaking News
15 ऑगस्ट रोजी कल्याण-डोंबिवलीत मांसाहार बंदी
कल्याण - स्वातंत्र्य दिनानिमित्त कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रातील सर्व लहान आणि मोठ्या जनावरांचे कत्तलखाने बंद ठेवण्यात येणार आहेत, असे आदेश कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून जारी करण्यात आले. त्यानुसार 15 ऑगस्टला रात्री 12 पासून 15 ऑगस्ट रात्री 12 वाजेपर्यंत पर्यंत प्राण्यांची कत्तल करू नये, असे आदेश महापालिकेने दिले आहेत. शिवाय मांस विक्रीही या दिवशी करू नये असे महापालिकेने सांगितले आहे. जनावरांची कत्तल आणि मांसविक्री केल्यास कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता. त्याचबरोबर नागपूर आणि मालेगाव या महानगर पालिकांनीही स्वातंत्र्य दिन आणि श्रीकृष्ण जयंती निमित्त शुक्रवार 15 ऑगस्ट 2025 रोजी शहरातील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद राहतील असे आदेश दिले आहेत.
नॉन-व्हेजवर बंदी प्रकरणी प्रश्न विचारला असता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे म्हणाले, आम्ही याचा कडकडून विरोध करू. 15 ऑगस्टच्या दिवशी व्हेज खा नाहीतर नॉन व्हेज खा हे सांगण्याचा अधिकार या महानगरपालिकांना नाही आणि आयुक्तांनाही नाही. लोकांनी काय करावे, काय करू नये, काय खावे किंवा काय खाऊ नये हे त्यांना सांगण्याचा अधिकार नाही.
अनेक लोक व्हेज खातात त्यांना विरोध नाही. पण जे आमच्यासारखे नॉन व्हेज खाणारे लोक आहेत, जे कल्याण डोंबिवलीमध्ये आगरी-कोळी बांधव आहेत ते काय करणार त्या दिवशी? आणि आमच्या राज्यात येऊन तुम्ही हे व्हेज खाण्याचे लादत आहात का? असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर