डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 120 वा लग्नसोहळा भायखळ्यात जल्लोषात
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 120 वा लग्नसोहळा भायखळ्यात जल्लोषात
महानगर
मुंबई - दक्षिण मुंबई बौद्ध सेवा संघ यांच्या वतीने, त्यागमाता रमाई व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १२० वा. लग्न सोहळा दि.४ एप्रिल भायखळा मच्छी मार्केट डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड , भायखळा पश्चिम, मुंबई येथे नुकताच संघाचे अध्यक्ष भगवान तांबे यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडला. याच मार्केटमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रमाबाई आंबेडकर यांच्या लग्न सोहळा 120 वर्षांपूर्वी घडला होता. या कार्यक्रमांमध्ये बाबासाहेबांच्या आठवणी सभागृह गहिवरून गेले होते. विविध मान्यवरांनी आपापले मनोगत यावेळी बाबासाहेबांबद्दल व्यक्त केले.सदर कार्यक्रमाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते, भायखळा विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री. मनोज पांडुरंग जामसुतकर, प्रभाग क्रमांक २१० च्या नगरसेविका सौ.सोनम मनोज जामसुतकर यांच्यासह ईतर सर्व धर्मीय मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मा. नागेश जाधव, धार्मिक विधि बौद्धाचार्य मा. दिपक क्षीरसागर, मा.मनोज मोरे, मा.अशोक केदारे यांनी केला. तसेच आभार व्यक्त सरचिटणीस मा.अनुराधा साळवे यांनी केले. विषेश सहकार्य मा.मोहन मर्चंट,मा. शांतु डोळस,मा.आनंद खरात, मा.नितिन जाधव, मा.धमू आगरकर, मा. आनंद साळवे, मा. सुनिल देठे, सुमेद सुर्वे ,तसेच सर्व संघाचे कार्यकारीणी, पदाधिकारी,सदस्य व इतर सामाजिक क्षेत्रातील राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते बौद्ध बांधव लग्न सोहळ्यात उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर