ज्येष्ठ कबड्डीपटूंचा झाला डिलाईल रोड येथे सन्मान, आमदार सुनील शिंदे यांचा पुढाकार
ज्येष्ठ कबड्डीपटूंचा झाला डिलाईल रोड येथे सन्मान, आमदार सुनील शिंदे यांचा पुढाकार
मुंबई - आमदार सुनिल शिंदे ह्यांच्या संकल्पनेतून डिलाईल रोड येथील अमरप्रेम क्रीडा मंडळाच्या वतीने कबड्डीची पंढरी म्हणून ओळखले जाणारे श्रमिक जिमखाना मैदानाच्या हिरक महोत्सवी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्राच्या मातीतल्या ह्या कबड्डी खेळासाठी योगदान देणाऱ्या मान्यवरांचा पारितोषिक आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. महाराष्ट्रातील या मातीच्या खेळासाठी आपले आयुष्य ओवन टाकणारे अनेक कबड्डीपटू या गिरणगाव विभागातून झाले. या गिरणगाव विभागाला कबड्डीचे माहेर घर समजले जात. या जेष्ठ खेळाडूंच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करून त्यांचा सन्मान करणे हे मी माझे परम कर्तव्य समजतो. त्याच भावनेतून आम्ही त्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते त्यास मोठ्या संख्येने विभागातील ज्येष्ठ कबड्डीपटू उपस्थित राहिले आणि यापुढे देखील त्यांचा आम्ही असाच सन्मान करणार अशी माहिती शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांनी या कार्यक्रमादरम्यान दिली. वरळी, प्रभादेवी आणि संपूर्ण गिरणगाव परिसरात मोठ्या संख्येने युवा कबड्डीपटू अजूनही कबड्डीसाठी सराव करताना मी पाहतो. पूर्वी या कबड्डी खेळामुळेच अनेक लोकांना शासकीय आणि केंद्र सरकारच्या नोकऱ्यांचा लाभ मिळाला. परंतु आता कुठेतरी नोकऱ्यांचे प्रमाण कमी झाला आहे. ते प्रमाण कसं वाढेल आणि या विभागातील युवकांना नोकरी कशा मिळतील यासाठी आम्ही केंद्र आणि राज्य सरकारसोबत पाठपुरावा करणार असून या महाराष्ट्रातील मराठी मातीचा खेळ कबड्डीसाठी आम्ही शासनाच्या विविध योजना आणणार असल्याची माहिती आमदार महेश सावंत यांनी दिली. या कार्यक्रमांमध्ये ज्येष्ठ कबड्डीपटू सदानंद शेट्ये यांचा उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. ह्यावेळी युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव, आमदार अजय चौधरी, शिवसेना उपनेत्या मुंबई महानगरपालिका विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, विभागप्रमुख आमदार महेश सावंत, मुंबईचे माजी महापौर महादेव देवळे, माजी हॉकीपटू धनराज पिल्ले तसेच दिग्गज कबड्डीपटू, शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
सेलिब्रिटी बर्थडे
Rajkummar Rao
- जन्मदिन
- August 31
Nagarjuna Akkineni
- जन्मदिन
- August 29
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर