आसाम आणि पुदुचेरीमध्ये इतिहासातील सर्वाधिक मतदानाची नोंद
आसाम आणि पुदुचेरीमध्ये इतिहासातील सर्वाधिक मतदानाची नोंद
मुंबई-भारतातील विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत आसाम, केरळ आणि पुदुचेरी या दोन राज्यांसह एका केंद्रशासित प्रदेशात मतदारांनी अभूतपूर्व उत्साह दाखवला आहे. या तिन्ही ठिकाणी मतदानाचे जुने सर्व विक्रम मोडीत निघाले आहेत. निवडणूक आयोगाने अद्याप अंतिम आकडेवारी जाहीर केली नसली, तरी आतापर्यंतची ही टक्केवारी लोकशाहीसाठी अत्यंत आश्वासक मानली जात आहे. आसाम, केरळ आणि पुदुचेरी येथील विधानसभा निवडणुका, तसेच तीन राज्यांमधील चार विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकांसाठी काल मतदान मोठ्या प्रमाणावर शांततेत पार पडले.
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, आसाममध्ये ८५.३८ टक्के, तर पुदुचेरीमध्ये ८९.८३ टक्के मतदान झाले. दोन्ही ठिकाणी त्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वाधिक टक्केवारी आहे. केरळमध्ये ७८.०३ टक्के मतदान झाले.
पोटनिवडणुकांमध्ये, कर्नाटकातील बागलकोट मतदारसंघात ६८.७० टक्के, तर दावणगेरे दक्षिणमध्ये ६८.५५ टक्के मतदान झाले. नागालँडमधील कोरिडांगमध्ये ८२.२१ टक्के, तर त्रिपुरातील धर्मनगरमध्ये ८० टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद झाली.
आसाम राज्यातील ३५ पैकी २६ जिल्ह्यांमध्ये ८० टक्क्यांहून अधिक मतदान झाले, ही बाब विशेष उल्लेखनीय आहे. यामध्ये ‘दक्षिण सालमारा मानकाचर’ जिल्ह्यात सर्वाधिक ९५.५६ टक्के इतके प्रचंड मतदान झाले, तर ‘पश्चिम कार्बी आंगलोंग’ मध्ये सर्वात कमी म्हणजे ७५.२५ टक्के मतदान झाले.
केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुदुचेरीमध्येही इतिहासातील सर्वाधिक ८९.८७ टक्के मतदानाची नोंद झाली. ३० विधानसभा जागांसाठी झालेल्या या मतदानात १० लाख मतदारांनी आपला हक्क बजावला. यापूर्वीचा उच्चांकी विक्रम ८५ टक्के होता. पुदुचेरी जिल्ह्यात सर्वाधिक ९०.४७ टक्के, तर कराईकलमध्ये ८६.७७ टक्के मतदान झाले. पुदुचेरीच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर मतदार घराबाहेर पडल्याचे दिसून आले आहे.
केरळमध्ये १९८७ नंतरचे सर्वाधिक ७८.२७ टक्के मतदान झाले. राज्यातील १४० जागांसाठी सुमारे ८९० उमेदवार रिंगणात असून २.७१ कोटी मतदारांनी आपला कौल दिला आहे. कोझिकोडमध्ये सर्वाधिक ८१.३२ टक्के, तर पथानामथिट्टामध्ये सर्वात कमी ७०.७६ टक्के मतदान झाले.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी, निवडणूक आयुक्त डॉ. एस. एस. संधू आणि डॉ. विवेक जोशी यांच्यासह, थेट वेबकास्टिंगद्वारे मतदान प्रक्रियेवर देखरेख ठेवली, जी या भागांतील सर्व मतदान केंद्रांवर प्रथमच राबविण्यात आली होती.
ईव्हीएम मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत छायाचित्र, मोबाईल डिपॉझिट सुविधा, सुधारित मतदार माहिती स्लिप्स आणि प्रत्येक मतदान केंद्रावर १,२०० मतदारांची मर्यादा यांसारख्या अनेक मतदार-स्नेही उपाययोजना सुरू करण्यात आल्या.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade