डॉ. गजानन रत्नपारखी यांची अध्यक्षपदी नियुक्ती
डॉ. गजानन रत्नपारखी यांची अध्यक्षपदी नियुक्ती
मुंबई - हृदयरोगतज्ज्ञ डॉ. गजानन रत्नपारखी यांची भाजप डॉक्टर सेलच्या मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचे पत्र त्यांना मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. डॉ. गजानन रत्नपारखी हे मुंबईतील प्रख्यात कार्डिओलॉजिस्ट आहेत. गुरुकृपा हार्ट फाऊंडेशनच्या माध्यमातून रत्नपारखी यांनी १३ नाईट स्कूल दत्तक घेतली आहेत. दरवर्षी चार हजार विद्यार्थ्यांना संपूर्ण शालेय साहित्याचे मोफत वाटप केले जाते. आदिवासी भागातील विद्यार्थ्यांची नियमित वैद्यकीय तपासणी, गणवेश व ब्लँकेटचे वाटप डॉ. रत्नपारखी यांच्या संस्थेमार्फत केले जाते. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांची भाजपच्या मुंबई डॉक्टर सेलच्या (संयोजक) अध्यक्षपदी नेमणूक केली गेल्याचे सांगितले जात आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर