आता AI ने होणार UPI Payment
आता AI ने होणार UPI Payment
मुंबई-: AI च्या मदतीने आता डिजिटल पेमेंट अधिक सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. युनिफाईड एजेंट प्रोटोकॉलवर (UAP) सध्या काम सुरू आहे. त्यातंर्गत AI-एजेंट युझर्सच्या परवानगीने युपीआयच्या माध्यमातून बिल पेमेंटपासून लहान लहान व्यवहार बिनदिक्कत पूर्ण करेल. हा प्रोटोकॉल राष्ट्रीय देयके महामंडळा( NPCI) बाजारातील बड्या खेळाडूंसोबत मिळून तयार करत आहे. AI एजेंटच्या मदतीने सुरक्षित नोंदणी, योग्य पडताळा आणि अधिकृत व्यवहाराची शाश्वती निश्चित करण्यात येईल.
या नवीन प्रक्रियेला युनिफाई एजेंट प्रोटोकॉल (UAP) असे नाव देण्यात आले आहे. AI एजेंटच्या माध्यमातून सुरक्षित आणि विश्वासहार्य व्यवहार पूर्ण करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.
डिजिटल पेमेंट अधिक स्मार्ट होण्यासाठी ही प्रक्रिया तयार करण्यात येत आहे. युझर्सकडून कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) आर्थिक व्यवहारासाठी वापर करण्याची परवानगी घेण्यात येईल. सर्वच व्यवहार एआयच्या माध्यमातून होणार नाही. पण हिस्ट्रीच्या आधारे दरमहा होणारा निश्चित खर्च , त्यात शिकवणी खर्च, ठराविक बिलं, निश्चित पेमेंट्स एआय पूर्ण करेल. परिणामी तुमचा वेळ तर वाचेलच. पण विलंब शुल्काचा त्रास वाचेल. तुमची बाजारातील पत कायम राहील.
हा प्रोटोकॉल तयार करण्याची जबाबदारी राष्ट्रीय देयके महामंडळाकडे (NPCI) सोपवण्यात आली आहे. यासाठी तंत्रज्ञानातील आघाडीच्या कंपन्या आणि इंडस्ट्रीतील तज्ज्ञांकडून सूचना, हरकती मागवण्यात आल्या आहेत
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
24 SEPT TO 30 SEPT 2026...
- 24 September, 2026
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade