बेंबळा धरणाचे 20 दरवाजे उघडले
बेंबळा धरणाचे 20 दरवाजे उघडले
यवतमाळ – बेंबळा नदी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमानात वाढ झाल्यामुळे जलाशयातील पाणीपातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी तसेच वरच्या बाजूच्या गावांतील पूरपरिस्थिती टाळण्यासाठी बेंबळा प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या आदेशानुसार आज पहाटे 4.00 वाजता धरणाचे एकूण 20 दरवाजे 50 सेमीने उघडण्यात आले आहेत.
सद्यस्थितीत धरणातून 1000 घनमीटर प्रति सेकंद एवढा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. सदर धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवकानुसार हा विसर्ग कमी-जास्त करण्यात येणार आहे. या पाणलोट क्षेत्रात पाऊस अजूनही सुरू असल्याने पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बेंबळा नदीकाठच्या सर्व गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीकाठच्या नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade