आज होणार फैसला! कर्णधार वैभव सूर्यवंशीच्या नेतृत्वात टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका
आज होणार फैसला! कर्णधार वैभव सूर्यवंशीच्या नेतृत्वात टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका
भारताची अंडर-19 क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. वैभव सूर्यवंशीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात DLS पद्धतीने विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून भारतीय युवा संघाला मालिकेत अजेय आघाडी मिळवायची आहे. त्यामुळे हा सामना चुरशीचा होण्याची दाट शक्यता आहे.
पहिल्या सामन्यात कर्णधार वैभव सूर्यवंशीची बॅट अपेक्षेप्रमाणे चालली नाही. त्याला केवळ 11 धावा करता आल्या. मात्र, दुसऱ्या सामन्यात त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे. या मालिकेत वैभव संघाचे नेतृत्व करत असून, कर्णधार म्हणूनही त्याच्यावर जबाबदारी आहे.
सामना किती वाजता सुरू होणार?
भारत आणि दक्षिण आफ्रिका अंडर-19 संघामधील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 वाजता सुरू होईल. भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी 1.30 वाजता सुरू होणार आहे. टॉससाठी दोन्ही संघाचे कर्णधार दुपारी 1 वाजता मैदानावर येतील.
दुसरा सामना LIVE कुठे पाहायचा?
या मालिकेतील सामने स्टार स्पोर्ट्सवर थेट प्रसारित होणार होते, तर जिओ हॉटस्टारवर LIVE स्ट्रीमिंग उपलब्ध होणार होती. मात्र, पहिल्या सामन्याच्या अगोदरच काही तांत्रिक अडचणींमुळे सामना टेलिव्हिजनवर प्रसारित होणार नसल्याची माहिती स्टार स्पोर्ट्सकडून देण्यात आली होती. त्यामुळे आता दुसरा सामना LIVE टेलिकास्ट होणार की नाही, याबाबतही संभ्रम आहे. जर ब्रॉडकास्टर्सनी तांत्रिक अडचणी दूर केल्या असतील, तर सामना थेट पाहता येईल. अन्यथा, टीव्हीवर सामना पाहणे कठीण ठरू शकते.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
18 DEC TO 24 DEC 2025...
- 24 December, 2025
27 NOV TO 3 DEC 2025 (25)
- 03 December, 2025
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर