केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा होणार भव्य नागरी सत्कार
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा होणार भव्य नागरी सत्कार
मुंबई: – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांचा भारत सरकारमध्ये सामाजिक न्याय राज्यमंत्री पदाच्या कारकीर्दीला 10 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेशच्या वतीने ना. रामदास आठवले यांचा भव्य नागरी सत्कार येत्या दिनांक 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता मुंबईत यशवंतराव प्रतिष्ठाणच्या 6 व्या मजल्यावरील सभागृहात हा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री पदाचा दशकपूर्तीचा या भव्य सत्कार सोहळ्यास केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांचे अभिनंदन करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई अजित पवार, ज्येष्ठ नेते कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री आशिष शेलार, सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा, विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, समाज कल्याणचे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट, आदि अनेक मान्यवर या सत्कार सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांच्या अध्यक्षतेत या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती आज रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश नहातेकर, महाराष्ट्र राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे, मुंबई प्रदेश अध्यक्ष सिध्दार्थ कासारे, मुंबई प्रदेश सरचिटणीस विवेक पवार आदि मान्यवर नेत्यांनी या पत्रकार परिषदेत संबोधीत केले.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant