“स्वामी समर्थ” गाण्याचा संगीत अनावरण सोहळा गिरगाव शोभा यात्रेत संपन्न
“स्वामी समर्थ” गाण्याचा संगीत अनावरण सोहळा गिरगाव शोभा यात्रेत संपन्न
मुंबई - गुढीपाडवा आणि नव्या वर्षाचे औचित्य साधत संगीतकार प्रवीण कोळी व योगिता कोळी यांनी “स्वामी समर्थ” गाणं मुंबईतल्या गिरगाव शोभा यात्रेत प्रदर्शित केल आहे. या गाण्यात जाऊबाई गावात रिएलिटी शो फेम अभिनेत्री अंकिता मेस्त्री आणि स्वामी भक्त शुभम खरिवले हे प्रमुख कलाकार आहेत. गुढीपाडव्या निमित्त कोलीवूड प्रोडक्शन प्रस्तुत स्वामी समर्थ या गाण्याचे लाँचिंग गिरगाव शोभा यात्रेत मोठ्या उत्साहात करण्यात आले. या शोभा यात्रेत प्रवीण कोळी व योगिता कोळी यांच्या समवेत अभिनेत्री अंकिता मेस्त्री, ऋतुजा जगदाळे, पालवी कदम आणि उपासना म्हात्रे देखील सहभागी झाल्या होत्या.
स्वामींचा संदेश तुमच्या आत्मविश्वासाला जागृत करणार कोलिवूड प्रोडक्शन प्रस्तुत “स्वामी समर्थ” गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आल आहे. हे गाणं हृदयस्पर्शी, भावनिक, आणि प्रेरणादायी असून या गाण्यात अभिनेत्री अंकिता मेस्त्री आणि स्वामी भक्त शुभम खरीवले यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. हे गाण इंडियन आयडॉल फेम गायिका संचारी सेन गुप्ता हिने गायल आहे. या गाण्याचे संगीत व शब्दरचना प्रवीण कोळी आणि योगिता कोळी यांनी केले आहे. गाण्याचे संगीत सयोजन रोहन तुपेने केले आहे. या गाण्याचे दिग्दर्शन प्रवीण कोळी यांनी केलं आहे. या गाण्याची निर्मिती प्रवीण कोळी यांनी केली आहे. या गाण्याचे छायाचित्रण संदेश कोळी व दुश्यांत कोळी यांनी केले असून आर्ट डिरेक्शन मोहित बापरकर व सूरज पाटील यांनी केले आहे.
संगीतकार प्रवीण कोळी स्वामी समर्थ गाण्याविषयी सांगतात, “आम्ही या आधी गोव्याच्या किनाऱ्यावर, लाडका देवबाप्पा, माझा बाप्पा, आई, दिंडी चालली, आई एकवीरा माऊली अश्या वेगवेगळ्या पद्धतीची गाणी केली आहेत. स्वामी कृपेचा महिमा अपरंपार आहे. आम्हाला स्वामीं गाण करण्याची खुप इच्छा होती. स्वामींनीच आमची ही इच्छा पूर्ण केली आहे अस मी मानतो. गुढीपाडवा आणि नव्या वर्षाची सुरुवात श्री स्वामी समर्थ यांच्या मंगलमय गाण्याने आज आम्ही करत आहोत. तसेच या गाण्याचा संगीत अनावरण सोहळा नुकताच गिरगाव शोभा यात्रेत उत्साहात पार पडला. सोशल मीडियावर गाण्याला सुंदर प्रतिसाद मिळत आहे. तसेच या गाण्याच्या संपूर्ण टीमने गाण्यासाठी खूप मेहनत केली आहे. तुम्ही हे गाण प्रवीण कोळी या यूट्यूब चॅनेलवर नक्की बघा वा आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कळवा.”
अभिनेत्री अंकिता मेस्त्री तिच्या पहिल्याच स्वामींच्या गाण्याच्या चित्रीकरणाच्या अनुभवाविषयी सांगते, “मी पहिल्यांदाच प्रवीण कोळी व कोलिवूड प्रोडक्शन सोबत काम करत आहे. पण त्यांच्यासोबतचा अनुभव खूपच सुंदर होता. या वर्षातील हे माझ पहिलच गाण आहे. तसेचं स्वामीना मी खुप मानते मला एकदा तरी स्वामींचं गाण करण्याची इच्छा होती. या गाण्यासाठी मला कॉल आला तेव्हा मी लगेच हो म्हणाले. शूटिंगचा किस्सा सांगायचा झाला, तर या गाण्याच शूट तळोजामधील स्वामींच्या मठात सुरू होत. शूटिंगच्या दरम्यान माझा पाय अचानक लाईटच्या वायर वर पडला आणि मला भयंकर करंट बसला. मी जागेवर खाली बसले. डोळ्यात पाणी सुद्धा आल तेवढ्यात मी मनात निर्धार केला आज काही झाल तरी हे शूट पूर्ण करायचं आणि पुन्हा मी शूट सुरू केल. स्वामींच्या कृपेने मी आज सुखरुप आहे. त्यांनीच मला बळ दिल. प्रेक्षकांचा गाण्याला प्रतिसाद पाहता खूप छान वाटतय. श्री स्वामी समर्थ.”
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant