हर्षवर्धन सदगीर डबल महाराष्ट्र केसरी
हर्षवर्धन सदगीर डबल महाराष्ट्र केसरी
पुणे - मानाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा थरार, पुण्यातील वाघोलीमध्ये रगंला आहे. माती गटातील विजेता महेंद्र गायकवाड आणि गादी गटातील विजेता हर्षवर्धन सदगीर यांच्यामध्ये 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम सामना रंगला. हर्षवर्धन सदगीर याने महेंद्र गायकवाडचा पराभव केला. 2026 चा महाराष्ट्र केसरीचा खिताब हर्षवर्धन सदगीर याने पटकावला आहे. हर्षवर्धन सदगीर डबल महाराष्ट्र केसरी ठरला आहे.
विशेष म्हणजे यंदाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत एकाच गुरुच्या दोन शिष्यांमध्ये लढत झाली. पैलवान काका पवार यांच्या तालमीतील महेंद्र गायकवाड आणि हर्षवर्धन सदगीर हे दोघे मल्ल आहेत. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील इतिहासामध्ये यंदा सर्वाधिक बक्षिसं ठेवण्यात आली आहेत. मानाची चांदीची गदा, 5 लाख रुपये आणि फॉर्च्युनर कार असं बक्षिसांचं स्वरुप आहे. गेली 68 वर्ष मानाची गदा कुस्तीमहर्षी मामासाहेब मोहोळ कुटुंबियांकडून दिली जाते.
हर्षवर्धन सदगीर आणि महेंद्र गायकवाड यांच्यात अत्यंत चुरसीशीचीू लढत झाली. महेंद्र गायकवाड यानं पहिल्या हाफमध्ये 1 गुण मिळवत आघाडी घेतली. यानंतर हर्षवर्धन सदगीर यानं एक गुण मिळवत बरोबरी केली. पहिला हाफ संपेपर्यंत 1-1 असा सामना बरोबरीत होता. दुसऱ्या हाफमध्ये महेंद्र गायकवाड याला एक्टिव्हिटी टास्क देण्यात आला, यात त्याला गुण मिळवता आला नाही. यामुळं हर्षवर्धन सदगीरला एक गुण मिळाला. यानंतर हर्षवर्धन सदगीर यानं दोन गुण मिळवले. अशा प्रकारे हर्षवर्धन सदगीर यानं 4-1 अशी आघाडी घेतली.यानंतर हर्षवर्धन सदगीर बाहेर गेल्यानं एक गुण महेंद्र गायकवाडला मिळाला. कुस्तीचा वेळ संपला तेव्हा हर्षवर्धन सदगीर यानं 4-2 असा विजय मिळवला. हर्षवर्धन सदगीर डबल महाराष्ट्र केसरी ठरलेला सातवा पैलवान ठरला आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर