मुंबईत रिक्षा, टॅक्सीचे भाडे वाढणार?
मुंबईत रिक्षा, टॅक्सीचे भाडे वाढणार?
मुंबई-: मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवास खर्चात आता वाढ होणार आहे. परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार भाडेवाढीच्या प्रस्तावात ऑटोरिक्षाच्या किमान भाड्यात १ रुपयाची, तर टॅक्सीच्या भाड्यात शहरभर २ ते ३ रुपयांची वाढ करण्याची शिफारस करण्यात आली आहे. हा प्रस्ताव परिवहन आयुक्तांच्या कार्यालयाकडून मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाकडे (MMRTA) पाठविला जाण्याची शक्यता आहे. सदर प्रस्ताव मंजूर झाल्यास ऑटोरिक्षाचे किमान भाडे सध्याच्या २६ रुपयांवरून २७ रुपये होऊ शकते. तसेच, टॅक्सीचे पहिल्या १.५ किमीचे किमान भाडे सध्याच्या ३१ रुपयांवरून किमान ३३ रुपये होण्याची शक्यता आहे.
मुंबई टॅक्सीमेन युनियनचे प्रमुख फ्रेडरिक डी’सा यांनी दिलेल्या माहितीनुसार काळ्या-पिवळ्या टॅक्सींच्या किमान भाड्यात किमान ४ रुपयांची वाढ करण्याचा प्रस्ताव परिवहन आयुक्तांच्या कार्यालयाकडे पाठवण्याची मागणी केली आहे.
गेल्या काही वर्षांत इंधन, वाहन देखभाल आणि इतर खर्च मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक सेवा सुरळीतपणे सुरू ठेवण्यासाठी आणि चालकांच्या वाढत्या दैनंदिन खर्चाची भरपाई करण्यासाठी भाडेवाढ आवश्यक असल्याचे रिक्षा आणि टॅक्सी संघटनांचे म्हणणे आहे.मात्र प्रवासी संघटनांकडून मात्र या दरवाढीच्या प्रस्तावाला मोठा विरोध करण्यात येत आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर