प्रश्नपत्रिका फुटीविरोधी सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर
प्रश्नपत्रिका फुटीविरोधी सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर
नवी दिल्ली-: सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकार व पेपरफुटीला आळा घालण्यासाठी आणलेले ‘सार्वजनिक परीक्षा (अनुचित मार्गांना प्रतिबंध) सुधारणा विधेयक, २०२६’ आज लोकसभेत प्रचंड गदारोळात आवाजी मतदानाद्वारे मंजूर करण्यात आले. हे विधेयक केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी संसदेत मांडले होते. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या बिलाच्या मंजुरीसाठी आवाजी मतदान घेतलं. दरम्यान या बिलाला लोकसभेत मंजुरी मिळण्यापूर्वी कामकाजादरम्यान चांगलाच गोंधळ झाल्याचं पहायला मिळालं, सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्याचं पहायला मिळालं. आज संसदेमध्ये बोलताना काँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष नेते असलेले राहुल गांधी चांगलेच आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. या विधेयकावर काल 9 तास चर्चा झाली. आज विरोधकांकडून राहुल गांधींनी विधेयकावर 50 मिनिटे भाषण केले. अखेर विरोधकांच्या गदारोळात हे विधेयक मंजूर झाले.
कठोर शिक्षा: दोषी व्यक्तींसाठी ५ ते १० वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची आणि ५० लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद.
संघटित गुन्हे: पेपरफुटीचे संघटित रॅकेट चालवणाऱ्यांना किमान ७ वर्षांची शिक्षा आणि १० कोटी रुपयांपर्यंतचा दंड.
सेवा प्रदाता कंपन्या: परीक्षा घेणाऱ्या दोषी कंपन्या व सर्व्हिस प्रोव्हायडर्ससाठी ५ कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद.
जलद न्याय: सर्व प्रकरणे जलदगती (फास्ट ट्रॅक) न्यायालयात चालवून, गुन्हा दाखल झाल्यापासून ५ महिन्यांच्या आत न्यायदान पूर्ण करण्याचे प्रस्तावित
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant