आता OTT वर धडकणार ‘धुरंधर 2’
आता OTT वर धडकणार ‘धुरंधर 2’
मुंबई - गेले २१ दिवस धुरंधर २ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला आहे. हा सिनेमा सर्वात कमी वेळात १००० कोटींचा नेट आकडा गाठणारा एकमेव भारतीय चित्रपट ठरला आहे. धुरंधर २ ने जागतिक पातळीवर १६६० कोटींहून अधिक कलेक्शन केले असून भारतात त्याने १२०० कोटींचा गल्ला पार केला आहे. कित्येकांनी हा सिनेमा एकपेक्षा जास्त वेळा थिएटरमध्ये जाऊन पाहिला आहे. अशातच आता या फिल्मच्या ओटीटी रिलीजसाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत.
धुरंधरचा पहिला भाग नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला होता. यानंतर प्रेक्षकांना वाटलं होतं की दुसरा भागही याच प्लॅटफॉर्मवर रिलीज होईल. मात्र, आदित्य धर यांनी या चित्रपटाचे डिजिटल हक्क ‘जिओ हॉटस्टार’ ला विकले आहेत.हा स्पाय थ्रिलर पाहण्यासाठी जिओ हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन घ्यावे लागणार आहे.
नुकतंच हाती आलेल्या रिपोर्टनुसार, जिओ हॉटस्टार हा सिनेमा IPL 2026 संपल्यानंतर स्ट्रीम करण्याच्या तयारीत आहे. आयपीएलची धामधूम सुरू असताना चित्रपटाच्या व्ह्यूअरशिपवर परिणाम होऊ नये, हा यामागचा विचार आहे. त्यामुळे, मे महिन्याचा शेवटचा आठवडा किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात ‘धुरंधर २’ ओटीटीवर धडक देण्याची दाट शक्यता आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
24 SEPT TO 30 SEPT 2026...
- 24 September, 2026
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर