पुण्यातील DJ वादावर मुख्यमंत्र्यांची सूचक भूमिका
पुण्यातील DJ वादावर मुख्यमंत्र्यांची सूचक भूमिका
मुंबई-: पुण्यातल्या गणेशोत्सवात यंदा डीजे वाजण्यावरून गदारोळ सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातच डीजेबंदीचे संकेत दिले आहेत. ‘णेकरांनी सांस्कृतिक पद्धतीने गणोशोत्सव साजरा केला पाहिजे, त्यांनी सांस्कृतिकपणे उत्सव कसा साजरा केला जातो हे महाराष्ट्राला दाखवून द्यावे’, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. एकप्रकारे डीजेचा आग्रह धरणाऱ्या भाजप नेते पदाधिकाऱ्यांचे त्यांनी अप्रत्यक्षपणे कान टोचले. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती आहे. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी पुण्यातला गणोशोत्सव आणि ‘डीजे की पारंपारिक वाद्ये’ यावरून सुरू असलेल्या वादावर रोखठोक भाष्य केले. फडणवीस यांनी मध्यम मार्ग काढून सांस्कृतिक पद्धतीने पुण्यातील गणेशोत्सव व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करून पुणेकरच हे करू शकतात, असे म्हणून त्यांचा हुरूपही वाढवला.
पुण्यात गणेशोत्सव काळात डीजे वाजला पाहिजे की नाही, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. मलाही मिडिया हेच विचारणार. पण मी सांगू इच्छितो की पुण्यात सांस्कृतिक पद्धतीनेच गणेशोत्सव साजरा झाला पाहिजे. संपूर्ण सांस्कृतिक पध्दतीने कसा गणेशोत्सव साजरा होतो हे पुणेकरांनी महाराष्ट्राला दाखवून द्यावे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
पुण्यात एकीकडे ध्वनी प्रदूषण नको, असे म्हणत पुणेकर एकवटले असताना दुसरीकडे भाजपच्या काही नेते पदाधिकाऱ्यांनी डीजेचा आग्रह धरला होता. आमच्याच सणांवर बंधनं का, असा सवाल उपस्थित करीत डीजे वाजलाच पाहिजे, अशी भूमिका त्यांनी घेतलेली होती. मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांस्कृतिक पद्धतीने उत्सव साजरा करा, असे सांगून डीजे बंदीचे संकेत दिल्याने कार्यकर्त्यांची पंचईत झालीआहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
24 SEPT TO 30 SEPT 2026...
- 24 September, 2026
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
सेलिब्रिटी बर्थडे
Hema Malini
- जन्मदिन
- October 16
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर