मुंबई काँग्रेस सहकार सेलची सहकार परिषदेच्या पूर्वतयारीची बैठक उत्साहात संपन्न
मुंबई काँग्रेस सहकार सेलची सहकार परिषदेच्या पूर्वतयारीची बैठक उत्साहात संपन्न
मुंबई- : मुंबई काँग्रेस सहकार सेलच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या आगामी सहकार परिषदेच्या पूर्वतयारीची महत्त्वपूर्ण बैठक सहकार सेलचे अध्यक्ष मा. यशवंत (भाई) सावंत यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. यावेळी बोलताना मा. यशवंत (भाई) सावंत यांनी, “मुंबईतील सहकार क्षेत्र हे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनाशी जोडलेले आहे. सहकारी संस्था व सभासदांच्या अडचणी सोडविण्यासाठी काँग्रेस सहकार सेल सातत्याने त्यांच्या पाठीशी उभा राहील. आगामी सहकार परिषद ही केवळ औपचारिक परिषद न राहता सहकार क्षेत्रातील प्रश्नांना दिशा देणारे प्रभावी व्यासपीठ ठरेल,” असा विश्वास व्यक्त केला.
या बैठकीत सहकार परिषदेचे नियोजन, मुंबईतील सहकारी संस्था व सभासदांचा व्यापक सहभाग, सहकार क्षेत्रातील विविध प्रलंबित प्रश्न तसेच आगामी संघटनात्मक कार्यक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मुंबई काँग्रेस सहकार सेलचे प्रशासकीय सरचिटणीस श्री. श्रीनिवास देवरुखकर यांनी परिषदेच्या पूर्वतयारीसाठी विविध स्तरांवर व्यापक संपर्क व संघटनात्मक नियोजन करण्याची भूमिका मांडली. “सहकार क्षेत्रातील प्रत्येक घटकाचा आवाज काँग्रेसच्या माध्यमातून बुलंद करून त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी प्रभावीपणे पाठपुरावा करू,” अशी माहिती देवरुखकर यांनी दिली. आगामी सहकार परिषद भव्य आणि यशस्वी करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
सदर बैठकीत मुंबई शहर कार्याध्यपदी अब्दुल कादर, मुंबई शहर प्रभारी पदी अरुण वशिर्डे श्री.मुंबई उपाध्यक्ष पदी श्री. किशोर शिंदे मुंबई पश्चिम उपनगरे कार्याध्यक्ष पदी श्री. केनेथ मिस्कीटा, प्रभारी पदी श्री. रवींद्र निकाळे, दक्षिण मुंबई उपाध्यक्ष पदी श्री. सोमनाथ चौधरी यांना नियुक्ती देण्यात आली.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant