कोकणासाठी ४ वातानुकूलित विशेष रेल्वेगाड्या
कोकणासाठी ४ वातानुकूलित विशेष रेल्वेगाड्या
मुंबई-उन्हाळी सुट्ट्यांमुळे प्रवाशांच्या वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर, मध्य रेल्वेने कोकण मार्गावर ४ वातानुकूलित विशेष सेवा चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या रेल्वेगाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि मडगाव स्थानकांदरम्यान धावतील.
उन्हाळी सुट्टीनिमित्त कोकणात गावी आणि पर्यटनाकरिता नागरिक मोठ्या संख्येने जातात. प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- मडगाव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एसी विशेष गाडीच्या ४ सेवा सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.
गाडी क्र. ०११२९ (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव वातानुकूलित विशेष) ही गाडी १० व १४ एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री १२.२० वाजता सुटेल. ही गाडी मडगाव येथे दुपारी ३.१५ वाजता पोहोचेल. मडगाव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वातानुकूलित विशेष ही गाडी मडगाव येथून १० व १४ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता सुटेल.
या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी आणि करमळी येथे थांबा असेल.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade