मुंबई महापालिकेतील अपात्र महिलांना मिळणार शिलाई मशीन उल्हासनगरमध्ये शांतीनगर स्मशानभूमीतील आंबेडकरांचा पुतळा स्थलांतरित करण्याची मागणी दूषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारींचा तातडीने व प्राधान्याने निपटारा करण्याचे निर्देश गॅस टंचाईमुळे बेस्टची उपाहारगृहे बंद अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषी मंत्री शेतक-यांच्या बांधावर भोंदूबाबा अशोक खरातला दुसऱ्या गुन्ह्यात पुन्हा अटक पुण्याला आवकाळी पावसानं झोडपलं गोकुळ दूध संघाची होणार चौकशी कुवेत एअरवेजच्या विमानातून आले 20 भारतीयांचे मृतदेह व्यावसायिक सिलिंडर ₹218 ने महागला विमान प्रवास महागणार, जेट इंधनाच्या किमती दुप्पट AI डेटा केंद्रांमुळे वाढत आहे पृथ्वीचे तापमान प्रिमियम पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ पाकीस्तानी नागरिकांनी मागीतला धुरंधरच्या कमाईमध्ये वाटा दुबईतून भारतात स्वस्त सोने आणण्यास मुदतवाढ महाराणी ताराबाईंबद्दल जैन मुनींचे वादग्रस्त व्यक्तव्य नवीन आर्थिक वर्षात रेडी रेकनर दर स्थिर, अश्विनी भिडे यांनी स्वीकारला आयुक्तपदाचा कार्यभार क्रिकेट कट्टा अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत स्टार क्रिकेट ग्रुप विजयी अष्टपैलू शिक्षक नितिन आहेर जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित !!! नांदूरमध्यमेश्वरमध्ये ‘ग्रेट व्हाईट पेलिकन’चे आगमन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यावर गुन्हा दाखल करा. डिजिटल सूचना फलकांमुळे मुंबईकरांना दिलासा? देशांतर्गत एलपीजी (LPG) उत्पादनात ४०% वाढ बेस्ट’ला बळकटी देण्यासाठी पालिकेचीकटिबद्धताकर्मचाऱ्यांच्या देणीप्रश्नी महापौर संवेदनशील २०११ पर्यंतची निवासी अतिक्रमणे झाली नियमानुकूल पेट्रोल आणि डिझेलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क १० रुपयांनी कमी रामोशी समाजाची होणार राज्यव्यापी परिषद थकीत करभरणा न करणाऱ्या मालमत्तांवर तत्काळ अटकावणी आणि जप्तीची कारवाई करावी – शालेय पाठ्यपुस्तकात अजितदादांच्या जीवन कार्यावर आधारित धडा घेण्याची आमदार राजकुमार बडोले यांची विधानसभेत आग्रही मागणी NCERT ने वगळला मराठा साम्राज्याच्या अटक ते कटक विस्ताराचा नकाशा युद्ध थांबवण्यासाठी ट्रम्पनी इराणसमोर ठेवल्या १५ अटी कोविड काळातील ९८ चित्रपटांना दिलासा; शासनमार्फत ४ कोटी ९० लाखाचा निधी वाटप शर्तभंग’ नियमित करण्याचे अधिकार आता जिल्हाधिकार्‍यांना! पाणी पुरवठ्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्याच्या मागण्यांबाबत आरे प्रशासन चर्चेस तयार साखर कारखान्यांच्या आर्थिक सहाय्यासाठी तातडीने राज्यस्तरीय समिती गठीत नारायण सुर्वे साहित्य संमेलनात गिरणगावचे रंगकर्मी राघवकुमार,कथालेखक काशिनाथ माटल यांना पुरस्कार जाहीर! भायखळा येथील शूटिंगबॉल स्पर्धेत इस्तियाक मालेगावने पटकावला प्रथम क्रमांक हर्षवर्धन सदगीर डबल महाराष्ट्र केसरी 1 एप्रिलपासून पॅनकार्डचे नियम बदलणार एकशे आठ क्रमांकाच्या रुग्णवाहिकांच्या तक्रारींची चौकशी सचिन अहिर सामान्यांच्या प्रश्नावर लढणारे लढाऊ व्यक्तिमत्व! खासदार अरविंद सावंत नगरसेवक सनी निम्हण यांच्या प्रयत्नातून औंध–डेक्कन बससेवा पुन्हा सुरू सोनं-चांदीच्या दरात घसरण सुरूच माजी मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचं निधन कोकणातील या जिल्ह्यातील सर्व गावे येणार विकिपीडियावर मिरा रोड येथे स्वामी समर्थ प्रकटदिन जल्लोषात पंतप्रधान मोदींनी साधला इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी संवाद हिमालयातील हिमनद्यांचा बर्फ वितळण्याचा वेग झाला दुप्पट PRARAMBH 2026 : नवीन इन्कम टॅक्स कायद्यासाठी देशव्यापी मोहीम बदलापूरहून फक्त अर्ध्या तासात गाठता येणार नवी मुंबई अशोक खरात या भोंदू बाबाची कोट्यवधींची संपत्ती उघड….. वनविभाग मासांहारी प्राण्यांना अधिवासातच देणार पुरेशी शिकार अवकाळी पावसामुळे मराठवाड्यातील 11. 5 हजार हेक्टर क्षेत्रातील पिकाचे नुकसान प्रसिद्ध कार्टून शो डोरेमॉनच्या‌ दिग्दर्शकाचे निधन “स्वामी समर्थ” गाण्याचा संगीत अनावरण सोहळा गिरगाव शोभा यात्रेत संपन्न २० वा ‘पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’ शुक्रवारपासून अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी उल्हासनगरमध्ये ‘एक खिडकी योजना’ भारतात होणार World Indoor Athletics Championship गुढी पाढवयामुळे ……. आले तरुणाईला उधाण केदारनाथ मंदीर प्रवेशासाठी गैरहिंदूंना द्यावे लागणार सनातनी असल्याचे प्रतिज्ञापत्र महिला खेळाडूंसह नोकरदार महिलांसाठी स्वच्छतागृहे कधी निर्माण करणार, राज्यात वाहनांवरील पर्यावरण कर झाला दुप्पट बिबटे आणि मानव संघर्ष टाळण्यासाठी आता कायद्यात सुधारणा… पोस्टाची प्रीमियम सेवा – २४ तासांत पोहोचणार पार्सल भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह देण्यासाठी कॅनडा सरकारने मागितले 35 लाख मुंबईतील पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्ग, मुख्य रस्ते व रहदारीचे रस्‍ते समतल करावेत, उप महापौर श्री. संजय घाडी 10 वी भूगोलाच्या 50 प्रश्नपत्रिकांचा संच चोरीला 10 वी भूगोलाच्या 50 प्रश्नपत्रिकांचा संच चोरीला 2026 चे साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर, या मराठी लेखकाचा सन्मान सेवानिवृत्त एस.टी. कर्मचाऱ्यांना पत्नीसह वर्षभर मोफत प्रवास सिंधू सेवा दलातर्फे शुक्रवारी (ता. २०) ‘चेटीचंड’ महोत्सव सक्तीने धर्मांतर विरोधी विधेयकावर विरोधी पक्षांमध्ये फूट बेकायदेशीर धर्मांतरणाच्या विरोधातील विधेयक सर्व धर्मियांसाठी समान…. Fastag वार्षिक पास १ एप्रिलपासून महागणार ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेला स्थगिती आणि मनाई आदेश देण्याची मागणी आखाती देशातील युद्धामुळे टरबुज उत्पादक शेतकऱ्यांना फटका… राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांना प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर भारतीय चित्रपटांसाठी आता सबटायटल्स आणि ऑडिओ वर्णन अनिवार्य भारतात अडकलेल्या परदेशी नागरिकांना व्हिसा मुदतवाढ LPG गॅसला पर्याय सापडल्याचा पुण्यातील शास्त्रज्ञांचा दावा गॅस पुरवठ्याच्या प्राधान्यक्रमाची नियमावली जारी अनधिकृत पार्किंग केलेल्या वाहनांमुळे पादचारी हैराण पंधरादिवसांत राज्यातील मद्यनिर्मिती बंद करावी लागणार WhatsApp, FB आणि Messenger वर फसवणूक टाळण्यासाठी Meta चे नवे फिचर्स मुंबई मनपाच्या शाळांमध्ये मध्यान्ह भोजनाऐवजी फळे वाटप सक्तीच्या धर्मांतरासाठी ७ वर्षांची कैद, ‘धर्मस्वातंत्र्य विधेयक’ विधानसभेत सादर जागतिक महिला दिन मनाला स्पर्श करणारा उपक्रम ठरला LPG टंचाईमुळे इन्डक्शनच्या मागणीत मोठी वाढ ग्रामीण भागात 45 दिवसांनंतरच बुक होणार LPG सिलेंडर प्रवासी सेवा देणाऱ्या वाहनांना ‘QR कोड’ अनिवार्य देशातील पहिली ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था महाराष्ट्राचीच…. जप्तीची कारवाई सुरू होताच २ हजार ८८८ मालमत्ताधारकांनी भरला कर महाराष्ट्र केसरी २०२५-२६’ कुस्ती स्पर्धेच्या बोधचिन्हाचे झाले अनावरण मुंबईतल्या घरासाठी गिरणी कामगार एकवटला! मुरबे बंदर प्रकल्पाच्या वैधतेवरच प्रश्नचिन्ह बहुचर्चित ‘ लाडकी बहीण ‘ योजनेवर येतोय चित्रपट प्रसिद्ध रॅपर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे मुंबई येथे आगमन ‘हॉवर्थ इंडिया’तर्फे महिला दिनी कर्तृत्त्ववान महिलांसह प्रमुख शहरांमध्ये ‘गिव्ह टू गेन’ मालिकेचे आयोजन माणिकडोह मधील २० बिबट्यांचे वनतारा केंद्रात स्थलांतर अंबरनाथ शिवमंदिर परिसरात 32 घरांवर बुलडोझर हवामान विभागाकडून उष्णतेचा अलर्ट जारी ६० रुपयांनी वाढले घरगुती Gas सिलिंडरचे दर या शहरांत सुरू होणार BSNL 5G सेवा एकल मातांना पूर्ण पालकत्वाचा अधिकार – न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कुंभदूत ॲपचे अनावरण बृहन्‍मुंबई महानगरपालिका स्‍थायी समिती अध्यक्षपदी श्री. प्रभाकर शिंदे यांची बिनविरोध निवड PCM ग्रुप घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही मिळेल मेडिकलला प्रवेश शेअर बाजारात भीषण भूकंप! इराण-अमेरिका युद्धाच्या सावटाखाली बाजार ‘रक्तबंबाळ पंतप्रधानांच्या मेन्यूला अस्सल मराठी तडका ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे पोस्टर आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनी झाले रिलीज! DGCA कडून विमान प्रवासातील गैरवर्तनाबाबत; ‘झीरो टॉलरन्स पॉलिसी’ लागू अभिनेता प्रसाद ओकच्या कामगिरीचा विश्वविक्रम राज्यसभेच्या ३७ जागांसाठी १६ मार्चला निवडणूक नाशिकमधील द्राक्ष उत्पादक संकटात विमानात एवढं फ्यूएल घेऊन बारामतीच्या दिशेने जाण्याचं कारण काय? जन गण मन आधी ‘वंदे मातरम्’ गाण्याला दल खालसाचा विरोध राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक पद भरतीस मान्यता काळाचौकी येथे खोदकामामुळे अपघातात वाढ हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘हार्टस्ट्रॉंग’ पुस्तकातून मार्गदर्शन आणि उपाय मस्क यांची AI कंपनी चंद्रावर उभारणार फॅक्टरी भोईवाडा परिसरात वाहतूक विभागाची धडक संयुक्त कारवाई; नगरसेविका श्रद्धा जाधव सोडवणार क्यू आर कोडने नागरी समस्या महाशिवरात्रीसाठी भीमाशंकर मंदिर राहणार बंद भारत लवकरच या देशात UPI लाँन्च करणार RSS च्या कार्यक्रमाला सलमान खानची उपस्थिती लाडक्या बहिणींच्या e-KYC ला मुदतवाढ १२ जिल्हापरिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी उद्या मतदान देशभर ओला, उबर आणि रॅपिडो चा संप इस्लामाबादमध्ये मशिदीवर आत्मघातकी हल्ला 31 जण मृत्यूमुखी, 169 जखमी भारतातील पहिला AI IPO करी रोड पदपथांवरील हायड्रेलमुळे पादचारी हैराण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना मिळणार Z+ दर्जाची सुरक्षा चेक बाऊन्स प्रकरणी अभिनेता राजपाल यादव विरोधात अटक वॉरंट शक्तिपीठ महामार्गाच्या खर्चात तब्बल १५ हजार कोटींची वाढ अजितदादा पवार यांचे संगमवाडी येथे भव्य स्मारक उभारण्याची मागणी युमनाम खेमचंद सिंह झाले मणिपूरचे 13 वे मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली पहिल्या महिला उपमुख्यमंत्री पदाची शपथ भायखळा येथे दिवंगत कै.शरद (आप्पा) पवार उद्यानाचे झाले लोकार्पण आज निर्मला सीतारमण नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार, मतदार यादीत नाव न सापडल्यास BMC च्या या हेल्पलाईनवर कॉल करा प्रचारतोफा थंडावल्या, उमेदवारांना घरोघरी प्रचारास मुभा राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका 5 फेब्रुवारीला Blinkit, Zepto, Swiggy, Zomato ची 10 मिनिटांची डिलिव्हरी सर्व्हीस बंद नालासोपार्‍यात १० लाखांची रोकड जप्त यामिनी जाधव यांचा मुंबई पालिका निवडणुकीसाठी प्रचाराला वेग राजुलच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळे भांडुप मध्ये वेदांता समूहाचे अध्यक्ष दान करणार ७५ टक्के संपत्ती नाना आंबोले यांना शिवडीकरांचा वाढता प्रतिसाद ठाकरे बंधूंच्या मुलाखतीचा टीझर प्रसिद्ध क्रांतिज्योती विद्यालय ‘ सुपरहीट, पहिल्याच आठवड्यात ३.९१ कोटी कमाई राज्यभरात प्रचारसभांचा धुरळा, फडणवीस ठाणेकरांशी संवाद ... मुंबईत धावणार 18 डब्ब्यांची लोकल राज्यातील २७ लाख वाहनांना अद्यापही HSRP नाही, लवकरच तपासणी होणार बिनविरोध निवडीला मनसेचा हायकोर्टात आव्हान माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांचं दीर्घ आजारानं निधन वचन ठाकरेंचं! मुंबईकरांसाठी राज-उद्धव ठाकरेंकडून शिवशक्तीचा वचननामा जाहीर आज होणार फैसला! कर्णधार वैभव सूर्यवंशीच्या नेतृत्वात टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका राजुल संजय पाटील यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज संरक्षण क्षेत्रासाठी 79 हजार कोटींच्या खरेदी प्रस्तावाला मंजुरी ३३ वर्षांनंतर पुन्हा उघडणार जेजे हत्याकांडाची केस प्रशिक्षकपदावरून गौतम गंभीरला बीसीसीआयकडून मिळणार डच्चू? अखेर BCCI ने सोडलं मौन, पुण्यात भाजप, राष्ट्रवादीविरोधात लढणार, मविआचा फॉर्म्युला ठरला; 50-50-50 मनसेलाही सोबत घेणार शिवसेनेची लवकरच पहिली यादी; एकनाथ शिंदेंकडून 60 माजी नगरसेवकांना संधी, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी विशेष टोलमाफी पास पर्यूषण पर्वात दोन दिवस कत्तलखाने राहणार बंद २९ टक्के कोसळला या गेमिंग कंपनीचा शेअर Asia Cup मध्ये भारत-पाक आमने सामने- सरकारने दिली परवानगी 12 आणि 28 टक्क्यांचा GST स्लॅब होणार रद्द, सर्वसामान्यांना फायदा अमेरिकेत छत्रपती शिवरायांच्या कीर्तीरथाची भव्यदिव्य मिरवणूक कानात ईअर फोन असल्याने युवकाचा मृत्यू पोस्ट झाले अत्याधुनिक – अ‍ॅडव्हान्स पोस्टल टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म सुरु BSNL ची मान्सून ऑफर – 1 महिना मोफत इंटरनेट गणेश विसर्जनाच्या पार्श्वभुमीवर सामाजिक सलोख्यासाठी हजरत महंमद पैगंबर जयंती ८ सप्टेंबर रोजी होणार .. आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर निवृत्त न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी विरोधी पक्षाचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार प्रवासाला तब्बल बारा तास, मग टोल का द्यावा, सर्वोच्च न्यायालयाचा सवाल उपमुख्यमंत्री शिंदेंनी जाहीर केले ‘लाडकी सून’ अभियान मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी… कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ… उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंच झाले सुरू मतदार यादीबाबतचे आरोप शपथपत्रासह करा अन्यथा माफी मागा… शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेचा निकाल १८ ऑगस्टला जालन्यात मुसळधार पावसाने नदी नाले तुडुंब… मुंबईत पागडीधारकांना आदित्य ठाकरेंकडून पुनर्वसनाची हमी कॅडबरी डेअरी मिल्कच्या रॅपरवर खास मराठीत शब्द पहिल्याच दिवशी FASTag वार्षिक पासला भरभरुन प्रतिसाद, १.४ लाखांहून अधिक नोंदणी राज्यात १६ ते २१ ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीचा इशारा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्राचे उद्घाटन लवकरच ‘मुंबई विदिन ५९ मिनिट्स’ स्वप्न पूर्ण होणार डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौ.फुटांचे घर बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत सर्व घटकांना सोबत घेऊन विकास करणार ! नारळी पौर्णिमेला वरळीत हुल्लडबाजी करणाऱ्या उबाठा गटावर कारवाई करा BSF मध्ये 1121 जागांसाठी भरती; 10वी-12वी व ITI करु शकतात अर्ज 15 ऑगस्टपासून सुरू होणार FASTag Pass गणेशोत्सव काळात मुंबईत ‘डीजे’ला बंदी दादरमध्ये इमारतीच्या छतावर कबुतरखाना सुरू आधार कार्ड, व्होटर कार्ड,रेशन कार्ड हे नागरिकत्त्वाचे पुरावे नाहीत 15 ऑगस्ट रोजी कल्याण-डोंबिवलीत मांसाहार बंदी इथेनॉल पुरवठ्यात उ.प्रदेश पहिल्या तर महाराष्ट्र दुसर्‍या स्थानी हेपेटायटीस D पासून कर्करोगाचा धोका असल्याचा WHO चा निर्वाळा दहिहंडी सराव करताना 11 वर्षीय बालकाने गमावला जीव अमेरिकेच्या टॅरिफमुळे दोन अब्ज डॉलरची कोळंबी निर्यात धोक्यात सिंचन तलाव धोक्यात; भिंत खचली, २०० एकर शेतीला धोका…. हुतात्मा स्मारकाच ऐतिहासिक महत्त्व टिकले पाहिजे - आमदार सचिन अहिर रेल्वेकडून इतर प्रवाशांसह मुंबईकरांसाठी सुरक्षेच्या नव्या उपाययोजना राजकीय पक्षाचा चेहरा राहिलेली व्यक्ति न्यायालयाचा चेहरा असणे योग्य आहे का ? सरकारने लोकसभेत सादर केलेले आयकर विधेयक घेतले मागे अमेरिकेच्या टॅरिफचा भारतीय वस्त्रोद्योगाला मोठा फटका ठाणे जिल्ह्यातील या शहरात लवकरच सुरु होणार ‘पॉड टॅक्सी’ सेवा माथेरानची हातरिक्षा बंद करा – सर्वोच्च न्यायालयाचा आदेश कबुतरांना अन्न-पाणी देण्यावर उच्च न्यायालयाची बंदी कायम एक पडदा सिनेमागृहाबाबत संयुक्त समिती कोल्हापूरकर जिंकले, महादेवी हत्तीण पुन्हा येणार नांदणी मठात उत्तराखंडला गेलेले महाराष्ट्रातील सर्व पर्यटक सुखरूप ज्योतिर्लिंग विकास आराखड्यांच्या अंमलबजावणीसाठी सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती उत्तरकाशीमध्ये ढगफुटीमुळे हाहाकार, ४ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता भाजपाचे पदाधिकारी बनले न्यायाधीश, न्यायपालिकेचा निष्पक्षपणा धोक्यात? सेंचुरी मिलचा भूखंड कोणाच्या घशात घालणार? कामगार नेते गोविंदराव मोहिते‌ भायखळ्यात आमदार चषक 2025 ही भव्य हॉलीबॉल स्पर्धा संपन्न शिवसेना प्रभाग 205 च्या वतीने लाडू वाटप नृत्येश्वर संस्थेच्या विद्यार्थ्यांनी तैवानमध्ये भारतीय लोकनृत्यांची केली बहारदार सादरीकरण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो स्थानकाच्या नामकरणाविरोधात शिवसेनेचे आंदोलन एसटी आता करणार रिटेल (किरकोळ ) इंधन विक्री कबुतरांना खाद्य देणार्‍याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचा न्यायालयाचा आदेश काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा भाजपामध्ये प्रवेश ‘$1 ट्रिलियन’ अर्थव्यवस्थेकडे महाराष्ट्राची वेगवान वाटचाल! निवडणूक पारदर्शक होण्यासाठी मतदार यादी आधार क्रमांकाशी जोडा राज्यातील महापालिका रुग्णालयांमध्ये महिलांसाठी कर्करोग तपासणीची मोहीम हाती… स्वामीनाथन यांचा जन्मदिन “शाश्वत शेती दिन” म्हणून साजरा राज्य सरकारने जाहीर केले नवे सोशल मीडिया नियम राज ठाकरे आल्यानं कित्येक पटीनं आनंद- उद्धव ठाकरे खडसेंचा जावई पुण्यात रेव्ह पार्टीत रंगेहाथ पकडला गेला लाडकी बहीण योजनेसाठी 26.34 लाख महिला अपात्र जन्मतःच या बालकाच्या नावावर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड 10 उत्तीर्ण उमेदवारांसाठी IB मध्ये नोकरीची मोठी संधी शाळा, कॉलेज आणि कोचिंग संस्थांसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून 15 निर्देश जारी मुंबई रेल्वे साखळी स्फोट प्रकरण : हायकोर्टाच्या निकालाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती भारत आणि ब्रिटन यांच्यातील मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी ससून डॉकमधील मच्छीमारांच्या पुनर्वसनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल मुंबई के समुंदर में दुबे दुबे कर मारेंगे.. ; राज ठाकरे निशिकांत दुबेवर कडाडले सीमाभागातील निपाणी शहरात कन्नड भाषेची सक्ती महायुती सरकारला सत्तेचा माज -माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई महाराष्ट्राचीच , मुंबईत मराठी माणसाचाच आवाज बुलंद …. ‘जय गुजरात’ म्हणणारे एकनाथ शिंदे गुजरात व अमित शाहांचे गुलाम म्हाडा लॉटरीचा धडाका; ठाण्यात 2000 घरांसाठी सोडत, वाचा कधी येणार जाहिरात पावसाळ्यात केस का गळतात? अशी घरगुती उपाय करून थांबवा केस गळती NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

दूषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारींचा तातडीने व प्राधान्याने निपटारा करण्याचे निर्देश

दूषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारींचा तातडीने व प्राधान्याने निपटारा करण्याचे निर्देश

मुंबई - मुंबईकरांना विविध नागरी सेवा-सुविधा देणारी बृहन्मुंबई महानगरपालिका ही नागरिकांना दररोज पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा नियमितपणे करीत असते. याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेचा विविध स्तरावर वेळोवेळी गौरव देखील करण्यात आला आहे. तथापि, सध्या काही ठिकाणांहून पाणी पुरवठयाबाबतच्या तक्रारी येत आहेत. या तक्रारींचे संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित निराकरण करावे आणि पाणीविषयक सर्वच तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन त्यांचा निपटारा योग्य वेळेतच करावा. त्यासोबतच दूषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारींचा तातडीने आणि सर्वोच्य प्राधान्याने निपटारा करावा, असे सुस्पष्ट निर्देश अतिरिक्त महानगरपा‍लिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. तसेच जलवाहिन्यांवरील गळती तातडीने शोधून काढावी, गळती शोधून काढण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी पथके तैनात करावीत, असेही निर्देश श्री. बांगर यांनी गुरुवारी सायंकाळी आयोजित जल अभियंता खात्याच्या एका विशेष आढावा बैठकीदरम्यान दिले आहेत.

अतिरिक्त महानगरपा‍लिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर या बैठकीदरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून अपुरा पाणीपुरवठा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी काही ठिकाणांहून येत आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांनी विनाविलंब स्थळ पाहणी करावी. या पाहणी दरम्यान प्राप्त झालेल्या तक्रारीत तथ्य असल्याचे आढळल्यास विनाविलंब योग्य त्या उपाययोजना तातडीने कराव्यात. या उपाययोजनांमध्ये आवश्यक तेथे पाणीपुरवठ्याच्या सध्याच्या वितरण यंत्रणेमध्ये काही बदल केल्यामुळे काही मार्ग निघू शकतो. उदाहरणार्थ पाणीपुरवठ्याच्या ‘झोनिंग’ पद्धतीमध्ये योग्य त्या सुधारणा करणे, एखाद्या जलवाहिनीवर गळती उद्भवली असल्यास ही विनाविलंब दुरुस्त करणे, तर काही ठिकाणी व्यवस्थेमध्ये संरचनात्मक बदल करणे; आवश्यकतेनुसार अतिरिक्त ‘बूस्टिंग’ विनाविलंब करणे; यासारख्या बाबींचा उपाययोजनांमध्ये समावेश करता येईल.

वरीलनुसार अपु-या पाणीपुरवठ्याबाबत करण्यात येत असलेल्या कार्यवाहींबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींना अवगत करावे. शक्यतो लोकप्रतिनिधींच्या सोबत पाहणी दौरे करावेत, जेणेकरून त्यांच्याकडून जी माहिती मिळणे अपेक्षित आहे, ती माहिती थेटपणे मिळू शकेल, अशाही सूचना श्री. बांगर यांनी आढावा बैठकीदरम्यान दिल्या.

आढवा बैठकीदरम्यान दूषित पाण्याच्या तक्रारींबाबत देखील सविस्तर चर्चा करण्यात आली. याबाबत श्री. बांगर यांनी आदेशित केले की, दूषित पाण्याबाबतची तक्रार ही अत्यंत गांभीर्याने घेतली जावी. या तक्रारींबाबत कार्यवाही करताना कमालीची तत्परता (Extreme Urgency) दिसणे आवश्यक आहे. दूषित पाण्याच्या तक्रारींबाबत विना विलंब कार्यवाही झाली नाही, तर त्याचा परिणाम अत्यंत गंभीर होऊ शकतो, या बाबींची संबंधित अधिकाऱ्यांनी नोंद घेणे गरजेचे आहे. तसेच याबाबत सर्व यंत्रणांनी अत्यंत संवेदनशील राहणे गरजेचे आहे, अशाही सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

याच बैठकीदरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांना आदेशित करण्यात आले की, दूषित पाण्याचा उगम शोधण्याची कार्यवाही विना विलंब व ‘२४ × ७’ पद्धतीने कोणताही खंड न पडता करावी. ही कार्यवाही करताना आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध करून देणे देखील गरजेचे आहे. दूषित पाण्याच्या तक्रारींचा योग्य वेळेत निपटारा करण्यासाठी विशेष पथके गठीत करण्यात यावीत. ही पथके परिमंडळनिहाय उपलब्ध करून द्यावीत. जेणेकरून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्याबाबत विनाविलंब कार्यवाही करता येऊ शकेल‌. यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ आवश्यक असेल तर तशी विभागाने मागणी करावी. त्यानुसार मनुष्यबळ प्राधान्याने उपलब्ध करून दिले जाईल.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागातील पाणी पुरवठा, बांधकाम, नियोजन आणि परिरक्षण या प्रमुख उपविभागांनी एकमेकांशी नियमितपणे संवाद ठेवणे गरजेचे आहे. तसेच या अनुषंगाने जल अभियंता विभागातील उपविभागांचा एकमेकांशी नियमित सुसंवाद राहील; याची सुनिश्चिती जल अभियंता यांनी करावयाची असून याबाबत आवश्यक ती दक्षता घ्यावयाची आहे.

पाणीपुरवठा विषयक प्रकल्प हे विहित वेळेत पूर्ण होण्यास अडचणी येत असतील, तर अभियंत्यांना आवश्यकतेनुसार सहकार्य व मदत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दिली जावी. तसेच या अनुषंगाने कुणी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असेल, तर याबाबत जबाबदारी निश्चित करण्यासह संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी; असेही श्री. बांगर यांनी आजच्या बैठकीदरम्यान नमूद केले.

जल अभियंता खात्याच्या या बैठकीदरम्यान उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देशित करताना श्री, बांगर म्हणाले की, लवकरच पाणीपुरवठ्याच्या नियोजनाचा प्रभाग निहाय आढावा घेतला जाईल. या पार्श्वभूमीवर त्या – त्या विभागातील सहाय्यक अभियंता (जलकामे) यांनी आपापल्या कार्यक्षेत्राचा आणि कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या कामांचा आढावा घ्यावा व त्याबाबत आढावा बैठकीदरम्यान सादरीकरण करावे.

बृहन्मुंबई महानगर परिसरात महानगरपालिकेसह इतर प्राधिकरणांमार्फत रस्ते विकासासह इतर कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. या कामांमुळे पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या काही ठिकाणी स्थानांतरीत कराव्या लागतात, तर काही ठिकाणी जलवाहिन्यांना हानी पोहोचू शकते. यामुळे संबंधित परिसराचा पाणीपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात खंडित होऊ शकतो. अशी परिस्थिती उद्भवल्यास सदर परिसरातील जलवाहिन्यांची तातडीने दुरूस्ती करावी, अगर आवश्यकतेनुसार नवीन जलवाहिन्या टाकाव्यात. ही सर्व कामे करत असताना जल अभियंता खात्यातील विविध उपविभागांसोबतच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध खात्यांशी आणि मुंबईतील विविध प्राधिकरणांशी सुयोग्य समन्वय साधून लवकरात लवकर सदर कामे पूर्ण करावीत. जेणेकरून रस्त्यांची कामेदेखील निर्धारित वेळेत पूर्ण होण्यास मदत होईल, असेही श्री. बांगर यांनी आजच्या बैठकीदरम्यान आवर्जून आदेशित केले.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सध्या प्रगतीपथावर असलेली रस्त्यांची कामे, उन्हाळ्यात वाढणारी पाण्याची गरज आणि आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याची एक विशेष आढावा बैठक महानगरपालिका मुख्यालयात गुरुवारी सायंकाळी आयोजित करण्यात आली होती. ही बैठक अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उप आयुक्त (विशेष अभियांत्रिकी) श्री. पुरूषोत्तम माळवदे, जल अभियंता दिलीप पाटील यांच्यासह जल अभियंता खात्यातील संबंधित वरिष्ठ अभियंते व अधिकारी उपस्थित होते.


रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट