गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘अल्पोपहार व पाणी वाटप’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई : महाराष्ट्र माथाडी व जनरल कामगार संघ, संलग्न भारतीय मजदूर संघ यांच्या वतीने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेला ‘सर्व गणेश भक्तांसाठी अल्पोपहार व पाणी वाटप’ हा सामाजिक उपक्रम उत्साहात आणि अतिशय सुंदर पद्धतीने पार पडला.
या उपक्रमाचे आयोजन श्री. विजय (बुवा) कुलकर्णी यांच्या पुढाकाराने करण्यात आले. गणेशोत्सवासाठी विविध ठिकाणांहून येणाऱ्या अनेक गणेश मंडळांच्या पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच गणेशभक्तांनी अल्पोपहार व पाणी वाटपाचा लाभ घेतला. भक्तांची सेवा करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.
या सामाजिक उपक्रमाला मार्गदर्शक म्हणून अॅड. गुणरत्न सदावर्ते आणि अॅड. जयश्री पाटील मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सवाच्या काळात सेवा आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला.
गणेशोत्सव म्हणजे केवळ उत्सव नव्हे, तर भक्ती, सेवा आणि सामाजिक बांधिलकी जपण्याची परंपरा आहे, याचा सुंदर संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
???? गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
24 SEPT TO 30 SEPT 2026...
- 24 September, 2026
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
सेलिब्रिटी बर्थडे
मंत्री मा.ना. छगनराव भुजबळ
- जन्मदिन
- October 15
Hema Malini
- जन्मदिन
- October 16
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant