15 ऑगस्टपासून सुरू होणार FASTag Pass
15 ऑगस्टपासून सुरू होणार FASTag Pass
मुंबई - १५ ऑगस्टपासून केंद्र सरकार वार्षिक FASTag सुरू करणार आहे. या नवीन नियमामुळे टोल प्लाझा ओलांडणे आणखी सोपे होईल. ही FASTag annual pass योजना प्रामुख्याने कार, जीप आणि व्हॅन सारख्या खाजगी वाहनांसाठी लागू होईल. त्यात जड व्यावसायिक वाहनांचा समावेश नाही. वार्षिक फास्टॅगसाठी तुम्हाला ३००० रुपये रिचार्ज करावे लागतील. यामध्ये २०० फेऱ्या मोफत मिळतील.
सामान्यत: वाहनाच्या वजनानुसार टोल प्लाझावर १०० ते २०० रुपये शुल्क आकारले जाते, परंतु ३००० रुपयांचा FASTag annual pass घेतल्यावर एका फेरीचा खर्च फक्त १५ रुपये असेल. या योजनेमुळे लोकांचे पैसे वाचतीलच शिवाय टोल प्लाझा ओलांडणेही सोपे होईल.
वार्षिक FASTag पास मिळविण्यासाठी तुम्हाला स्वतंत्रपणे नवीन FASTag खरेदी करण्याची आवश्यकता नाही. फक्त विद्यमान FASTag अपडेट करा. ते सक्रिय करण्यासाठी, राष्ट्रीय महामार्ग प्रवास अॅप किंवा NHAI वेबसाइटवर जा.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
18 DEC TO 24 DEC 2025...
- 24 December, 2025
27 NOV TO 3 DEC 2025 (25)
- 03 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant