युद्धामुळे झालेल्या नुकसानासाठी UAE ने अमेरिकेकडे मागितली आर्थिक गॅरंटी
युद्धामुळे झालेल्या नुकसानासाठी UAE ने अमेरिकेकडे मागितली आर्थिक गॅरंटी
अबूधाबी-: इराण विरोधात अमेरीका आणि इस्राइलने पुकारलेल्या युद्धामुळे आखाती देशांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. याची भरपाई आता अमेरिकेला करावी लागणार आहे. UAE ने युद्धासाठी अमेरिकेला जबाबदार धरलं आहे. युद्धाची सुरुवात अमेरिकेनं केलेली असल्यानं त्यांनीच युद्धाचा खर्च उचलावा, अशी मागणी यूएईनं केली आहे. २८ फेब्रुवारीपासून सुरु झालेल्या युद्धात आखाती देशांचं प्रचंड नुकसान झालं आहे. इराणच्या युद्धात झालेल्या नुकसानाबद्दल UAE ने अमेरिकेकडे आर्थिक गॅरंटी मागितली आहे. युद्ध काळात इराणनं UAE तील ऊर्जा प्रकल्पांवर प्रामुख्यानं हल्ले चढवले. त्यासाठीच्या डागडुजीवर ६० बिलियन डॉलरपेक्षा अधिकचा खर्च येण्याचा अंदाज आहे. आखाती देशांमध्ये युद्धाचा सर्वाधिक फटका यूएईला बसला आहे. इराणच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्रं हल्ल्यांमध्ये दुबईचं मोठं नुकसान झालं आहे.
UAE ची मागणी अमेरिकेसाठी आर्थिक संकटांना आमंत्रण देणारी ठरु शकते. कारण यूएई पाठोपाठ आखातमधील अन्य देशही अशाच प्रकारची मागणी करु शकतात. तसं झाल्यास अमेरिकेवर मोठा आर्थिक बोजा पडू शकतो. आखातीमधील सगळ्याच देशांनी युद्धामुळे झालेल्या नुकसानाची वसुली अमेरिकेकडून मागितल्यास अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी वाढू शकतात.
युद्धात अमेरिका दररोज ८९ कोटी ते १ अब्ज डॉलर खर्च करत आहे. तर इस्रायलनं आतापर्यंत ११.२ बिलियन डॉलर खर्च केले आहेत. यातील निम्म्यापेक्षा अधिक रक्कम (६.२ बिलियन डॉलर) केवळ पहिल्या २० दिवसांमध्येच खर्च झाले.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant