कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू
कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू
गॅलरी
रत्नागिरी - रेल्वे ट्रॅकवर आलेली दगड माती काढण्याचे काम अखेर आज सायंकाळी पूर्ण झाले असून सायंकाळी 4 वाजून 30 मिनिटांनी कोकण रेल्वे मार्गावर दिवाणखवटी येथील ट्रॅक फिटनेस सर्टिफिकेट देण्यात आले आहे यामुळे रेल्वेची वाहतूक तब्बल चोवीस तासांच्या नंतर सुरू करण्यात आली आहे.
खेडनजिक नातूवाडी बोगद्याजवळ कोसळलेली दरड हटवण्याचे काम पावसामुळे चिखल झाल्यामुळे कठीण झाले होते , तो काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. या दरम्यान
रखडलेल्या प्रवाशांसाठी कोकण रेल्वेच्या मदतीला एसटी धावली.
विविध स्थानकांवर रखडलेल्या गाड्यांमधील प्रवाशांना मुंबई येथे सोडण्याकरता उपप्रबंधक यांनी केलेल्या मागणी नुसार एसटी बस पुरवण्यात आल्या. त्यामध्ये रत्नागिरी स्टेशन 40 बस, चिपळुण स्टेशन 18 बस आणि खेड स्टेशन 10 बस तर कणकवली येथून 12 बसेस अशा एकूण 80 बस सोडण्यात आल्या.खेड दिवाणखवटी येथे कोकण रेल्वे मार्गावर माती आल्यामुळे कोकण रेल्वे मार्ग बंद झाला होता. मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात चिखलयुक्त माती रेल्वे ट्रॅक वर आली. त्यामुळे हा मार्ग सुरू होण्यासाठी विलंब लागला. यामुळे यापूर्वी रद्द केलेल्या काही गाड्यांच्या सुटण्याच्या वेळेत बदल करून त्या सोडण्यात आल्या. यामध्ये 11100 मडगाव एलटीटी मडगावहून सायंकाळी सहा वाजून 30 मिनिटांनी . 12052 मडगाव सीएसटीएम जनशताब्दी एक्सप्रेस मडगावहून रात्र आठ वाजून तीस मिनिटांनी . 20112 मडगाव सीएसटीएम कोकण कन्या एक्सप्रेस मडगावहून आज रात्र अकरा वाजून 30 मिनिटांनी सुटेल तर 11004 सावंतवाडी दादर तुतारी एक्सप्रेस सावंतवाडीहून रात्र दहा वाजून तीस मिनिटांनी सुटेल.
विविध स्टेशनवर गेली दहा ते बारा तास उभ्या असलेल्या गाड्यांमधील प्रवाशांना काही ठिकाणी भोजन आणि नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व स्टेशन वरील उपाहारगृहांना सेवा सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कणकवली येथे रखडलेल्या प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबईपर्यंत पोहोचवण्यासाठी 513 प्रवाशांसाठी 12 एसटी गाड्यांची व्यवस्था करण्यात आली.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
18 DEC TO 24 DEC 2025...
- 24 December, 2025
27 NOV TO 3 DEC 2025 (25)
- 03 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
BIPIN ADHANGLE