IBPS द्वारे 11403 पदांची महाभरती
IBPS द्वारे 11403 पदांची महाभरती
मुंबई- : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) ने २०२६ च्या लिपिक भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीमध्ये देशभरातील ११ सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील एकूण ११,४०३ लिपिक पदे भरली जाणार आहेत. विशेष म्हणजे यातील 1051 पदे महाराष्ट्रासाठी आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार १ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट २०२६ पर्यंत अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात.उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरताना विहित अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे. सर्वसाधारण, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी अर्ज शुल्क ८५० रुपये आहे. एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी शुल्क १७५ रुपये आहे.
परिक्षेची तारीख
IBPS ने जाहीर केलेल्या परीक्षा वेळापत्रकानुसार, प्राथमिक परीक्षा १० आणि ११ ऑक्टोबर २०२६ रोजी होईल. यशस्वी उमेदवारांना त्यानंतर २७ डिसेंबर २०२६ रोजी स्थानिक भाषेतील प्राविण्य चाचणी द्यावी लागेल. दोन्ही टप्पे उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना त्यानंतर स्थानिक भाषेतील प्राविण्य चाचणी द्यावी लागेल.
या बँकांमध्ये होणार भरती
युनियन बँक ऑफ इंडिया’
पंजाब अँड सिंध बँक
बँक ऑफ इंडिया
बँक ऑफ महाराष्ट्र
सेंट्रल बँक ऑफ इंडिया
इंडियन बँक
पंजाब नॅशनल बँक
-बँक ऑफ बडोदा
कॅनरा बँक
इंडियन ओव्हरसीज बँक
यूसीओ बँक
राज्यनिहाय जागा
अंदमान आणि निकोबार – 18
आंध्र प्रदेश – 186
अरुणाचल प्रदेश – 45
आसाम – 349
बिहार – 491
चंदीगड – 20
छत्तीसगड – 265
दादरा आणि नगर हवेली – 18
दमण आणि दीव – 7
दिल्ली – 415
गोवा – 61
गुजरात – 698
हरियाणा – 196
हिमाचल प्रदेश – 97
जम्मू आणि काश्मीर – 67
झारखंड – 182
कर्नाटक – 1414
केरळ – 108
लडाख – 6
लक्षद्वीप – 11
मध्य प्रदेश – 570
महाराष्ट्र -1051
मणिपूर – 42
मेघालय – 22
मिझोरम – 17
नागालँड – 31
ओडिशा – 337
पुद्दुचेरी – 26
पंजाब – 481
राजस्थान – 392
सिक्कीम – २८
तामिळनाडू – 675
तेलंगणा – 191
त्रिपुरा – 64
उत्तर प्रदेश – 1731
उत्तराखंड – 145
पश्चिम बंगाल – 946
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर