राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेला (NPS) म्युनिसिपल मजदूर युनियनचा तीव्र विरोध !
राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेला (NPS) म्युनिसिपल मजदूर युनियनचा तीव्र विरोध !
मुंबई-बृहन्मुंबई महानगरपालिकेत दि. ५ मे २००८ नंतर नियुक्त झालेल्या कामगार, कर्मचारी, अधिकाऱ्यांना राज्य सरकारच्या धर्तीवर अंशदायी पेन्शन योजना (DC-1) लागू करण्यात आली आहे. आमच्या संघटनेच्यावतीने बृहन्मुंबई महानगरपालिकेतील दि. ५ मे २००८ नंतर महानगरपालिकेच्या सेवेत नियुक्त झालेल्या सर्वच कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेत प्रचलित असलेल्या निवृत्तीवेतन योजना १९५३ नुसार निवृत्ती वेतन देण्यात यावे यासाठी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. राज्य शासनाने त्यांच्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतनाबाबत शासन निर्णय क्रमांक संकिर्ण २०२३/प्र.क्र. ४६/सेवा-४, दि. २ फेब्रुवारी २०२४ नुसार शासन आदेश पारित केला असून त्यामध्ये राज्य शासनाने दि. १-११-२००५ पासून सेवेत लागलेल्या कर्मचाऱ्यांना नवीन अंशदायी पेन्शन योजना लागू केलेली आहे.
याबाबत तत्कालीन महापालिका आयुक्त श्री. भूषण गगराणी साहेब यांनी तत्वता निर्णय घेण्यात आला होता परंतु त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. दि. ५ मे २००८ नंतर सेवेत लागलेल्या सर्व कामगार, कर्मचारी, अधिकारी यांना जुनी पेन्शन योजना सुरू करावी ही आमच्या संघटनेची मागणी आहे. देशात, अनेक राज्यामध्ये व काँग्रेस शासीत राज्यामध्ये जुनी पेन्शन योजना सुरू आहे. मुंबई महापालिका ही स्वायत संस्था असल्यामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली आहे. त्यामुळेच सर्वच कामगार, कर्मचारी, अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन सुरू करावी अशी मागणी म्युनिसिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव व सरचिटणीस वामन कविस्कर यांनी केली आहे.
प्रशासनाने कोणत्याही संघटनेला विश्वासात न घेता एकतर्फीपणे स्थायी समितीच्या सभागृहात राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (NPS) मंजुरीसाठी ठराव आणत असल्याचे समजल्यामुळे आज बुधवार दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी स्थायी समिती अध्यक्ष श्री. प्रभाकर शिंदे, उप महापौर श्री. संजय घाडी, सभागृह नेते श्री, गणेश खणकर, विरोधी पक्षनेत्या श्रीम, किशोरीताई पेडणेकर यांना सदर योजनेस कामगार, कर्मचारी, अधिकाऱ्यांचा तीव्र विरोध असल्याचे लेखी स्वरूपात निवेदन देण्यात आले आहे.
सर्व नेत्यांनी असे आश्वासन दिले की, जोपर्यंत राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा (NPS) अभ्यास करून अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत आलेला प्रस्ताव परत पाठविणार आहोत. तसेच सर्व संघटनांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाणार असल्याचे आश्वासन स्थायी समिती अध्यक्ष श्री. प्रभाकर शिंदे साहेब व सभागृह नेते श्री. गणेश खणकर साहेब यांनी दिले आहे.
म्युनिसिपल मजदूर युनियनने अशी मागणी केली आहे की, कामगार, कर्मचाऱ्यांचे हित लक्षात घेऊन राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (NPS) लागू करण्यात येऊ नये. तसेच सदर योजना एकतर्फीपणे लागू केल्यास सर्व कामगार, कर्मचारी, अधिकारी कोणत्याही क्षणी तीव्र आंदोलन करणार असल्याची माहिती अध्यक्ष अशोक जाधव व सरचिटणीस वामन कविस्कर यांनी दिली.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर