मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. या बदलांचा लाभार्थ्यांना अधिक फायदा होईल. या लेखामध्ये आपण या बदलांचे तपशीलवार वर्णन करणार आहोत.
1. अर्जाची मुदतवाढ
योजनेत अर्ज करण्याची मुदत 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 ठेवण्यात आली होती. आता ही मुदतवाढ करून 31 ऑगस्ट 2024 पर्यंत केली आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांना अधिक वेळ मिळणार आहे.
2. आर्थिक लाभाची सुरुवात
31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज केलेल्या महिलांना 1 जुलै 2024 पासूनच दर महिन्याला 1500 रुपये आर्थिक लाभ मिळणार आहे.
3. अधिवास प्रमाणपत्र
अधिवास प्रमाणपत्र नसलेल्या महिलांना आता 15 वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्माचा दाखला देण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे लाभार्थ्यांना अधिक सोयीस्कर झाले आहे.
4. पाच एकर शेतीची अट रद्द
या योजनेतून पाच एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे. त्यामुळे अधिक महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल.
5. वयाची अट बदल
वयाची अट 21 ते 60 वर्षे होती. आता ही अट 21 ते 65 वर्षे करण्यात आली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना योजनेचा लाभ मिळू शकतो.
6. परराज्यातील महिलांसाठी बदल
परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषांबरोबर विवाह केल्यास त्यांच्या पतीचे जन्मदाखला, शाळा सोडल्याचा दाखला किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे.
7. उत्पन्नाचा दाखला नसल्यास सूट
उत्पन्नाचा दाखला नसलेल्या कुटुंबांना पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला देण्याची गरज नाही. त्यामुळे अर्ज प्रक्रियेतील अडचणी कमी होणार आहेत.
8. अविवाहित महिलांना लाभ
कुटुंबात एक अविवाहित महिला असल्यास, ती 21 ते 65 वर्षे वयोगटातील असल्यास, तिला योजनेचा लाभ घेता येईल. यामुळे अविवाहित महिलांनाही या योजनेचा फायदा होणार आहे.
समारोप हे बदल अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत आणि यामुळे अधिक महिलांना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेच्या बदलांची संपूर्ण माहिती आपण आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती देऊ त्यासाठी आत्ताच आपल्या ग्रुप वरती सामील व्हा.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत करण्यात आलेले सात महत्त्वाचे बदल लाभार्थी महिलांसाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहेत. अर्जाची मुदतवाढ, अधिवास प्रमाणपत्रासाठी पर्याय, पाच एकर शेतीची अट रद्द करणे, वयाची अट वाढविणे, उत्पन्नाचा दाखला नसल्यास सूट, परराज्यातील महिलांसाठी सुधारणा आणि अविवाहित महिलांना लाभ देण्याच्या निर्णयामुळे या योजनेचा अधिकाधिक महिलांना फायदा होईल. हे बदल महिलांच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक स्थितीत सुधारणा घडवून आणतील आणि योजनेच्या उद्दिष्टांना गती देतील.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
18 DEC TO 24 DEC 2025...
- 24 December, 2025
27 NOV TO 3 DEC 2025 (25)
- 03 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
BIPIN ADHANGLE