बनावट शालार्थ घोटाळ्यातील मुख्य आरोपी संजय गरुड अटकेत
बनावट शालार्थ घोटाळ्यातील मुख्य आरोपी संजय गरुड अटकेत
नाशिक -: राज्यभरात खळबळ उडालेल्या बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई करत मुख्य आरोपी तथा भाजप पदाधिकारी संजय गरुड याला सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथील एका फार्महाऊसवरून अटक केली. या प्रकरणातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी अटक मानली जात आहे.
पोलिस तपासात नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील तब्बल ८४१ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नावांचा गैरवापर झाल्याचे समोर आले आहे. तसेच आरोपी संजय गरुड याच्या १५ शैक्षणिक संस्थांतील १७७ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बनावट वैयक्तिक मान्यता (Personal Approval) देण्यात आल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे.
या बनावट शालार्थ आदेशांच्या आधारे शासनाची सुमारे ₹१६० कोटींची आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप असून, या संपूर्ण घोटाळ्याचा तपास नाशिक पोलीस करत आहेत. या प्रकरणात आणखी काही संशयितांची भूमिका तपासली जात असून, आर्थिक व्यवहार आणि संबंधित कागदपत्रांचीही चौकशी सुरू आहे.
दरम्यान, अटक करण्यात आलेल्या संजय गरुड याला मंगळवारी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीला १ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घोटाळ्याच्या तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता असून, संबंधित शैक्षणिक संस्था आणि इतर संबंधित व्यक्तींचीही चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर