कंपनी धर्मांतर प्रकरण: पाच आरोपी न्यायालयीन कोठडीत, एकाला पोलीस कोठडी…
कंपनी धर्मांतर प्रकरण: पाच आरोपी न्यायालयीन कोठडीत, एकाला पोलीस कोठडी…
नाशिक -: नाशिकमधील बहुराष्ट्रीय कंपनीतील कथित अत्याचार प्रकरणात महत्त्वपूर्ण घडामोड समोर आली आहे. न्यायाधीश आर. सी. नरवाडिया यांच्या समोर झालेल्या सुनावणीनंतर तौसीफ अत्तार, रझा मेमन, शाहरुख कुरेशी, शफी शेख आणि आसिफ अन्सारी या पाच आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, कंपनीचे ऑपरेशन मॅनेजर अश्विनी चेनानी यांना आज सकाळी पुणे येथून अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यातील आरोपींची संख्या सात झाली असून एक आरोपी फरार आहे, पोलीस त्याचा शोध घेत आहे. या प्रकरणाशी संबंधित एकूण नऊ वेगवेगळे गुन्हे दाखल असून, त्यांचा तपास विशेष तपास पथक (SIT) मार्फत सध्या सुरू आहे. तपासादरम्यान आणखी महत्त्वपूर्ण बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलीस प्रशासन या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
24 SEPT TO 30 SEPT 2026...
- 24 September, 2026
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर