जड वाहनांना ड्रायव्हर असिस्ट सिस्टिम’ बंधनकारक
जड वाहनांना ड्रायव्हर असिस्ट सिस्टिम’ बंधनकारक
मुंबई-: राज्यातील जड वाहन (एचएमव्ही) चालकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून, वर्षानुवर्षे सुरू असलेली क्लीनरची अनिवार्य अट अखेर रद्द करण्यात आली आहे. याऐवजी आता वाहनांमध्ये तंत्रज्ञानावर आधारित पर्यायांचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे. ‘मोटार वाहन कायदा, १९८८’ अंतर्गत ८ एप्रिल रोजी यासंदर्भातील राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले असून, यामुळे ट्रकचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
‘महाराष्ट्र मोटार वाहन (पहिली सुधारणा) नियम, २०२६’ नुसार, जर जड वाहनांमध्ये ‘ड्रायव्हर असिस्ट सिस्टिम’ बसवलेली असेल, तर क्लीनरची आवश्यकता भासणार नाही. या प्रणालीत ३६०-डिग्री कॅमेरा, ब्लाइंड-स्पॉट मॉनिटरिंग आणि ऑडिओ-व्हिज्युअल प्रॉक्सिमिटी अलर्ट यांसारख्या आधुनिक सुविधांचा समावेश असणे आवश्यक आहे. आतापर्यंत क्लीनर नसल्यास दररोज १,५०० रुपये दंड आकारला जात असे. एकाच प्रवासात अनेकवेळा दंड भरवा लागत असल्याने ट्रान्सपोर्ट क्षेत्रातून यावर तीव्र टीका होत होती.
वाहतूक संघटनांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला या निर्णयामुळे यश आले आहे. ‘ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस’चे (एआयएमटीसी) माजी अध्यक्ष आणि सल्लागार बाल मल्कित सिंग यांनी या निर्णयाचे स्वागत करताना हा वाहतूकदारांचा विजय असल्याचे म्हटले आहे. या निर्णयामुळे वाहतूकदारांची वार्षिक कोट्यवधी रुपयांची बचत होईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. मात्र, ओव्हरसाईज कार्गोसाठी वापरल्या जाणाऱ्या आर्टिक्युलेटेड सेमी-ट्रेलर आणि हायड्रोलिक ट्रेलरसाठी क्लीनरची अट अद्याप कायम ठेवण्यात आली आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant