नगरसेविका श्रद्धा जाधव सोडवणार क्यू आर कोडने नागरी समस्या
नगरसेविका श्रद्धा जाधव सोडवणार क्यू आर कोडने नागरी समस्या
मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक आत्ताच पार पडली. त्यातच अनेक महापौर आणि उपमहापौर पदाचे उमेदवारी ही ठरले. त्यातच निवडून आलेले नगरसेवक नागरी समस्या सोडवण्यासाठी नवनवीन डिजिटल प्लॅटफॉर्म उपयोगात आहे. नागरिकांची संपर्क करावा म्हणून शिवसेनेच्या परळ येथील नगरसेविका माजी महापौर श्रद्धा जाधव यांनी क्यू आर कोड च्या माध्यमातून नागरी समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी प्रभागातील नागरिकांना एक डिजिटल क्यू आर कोड उपलब्ध करून दिला आहे. या क्यू आर कोडचा माध्यमातून त्यांनी आपल्या वॉटर, मीटर, गटार आणि इतर कोणत्याही समस्या असतील त्या या क्यू आर कोड स्कॅन करून त्यावर थोडक्यात लिहा. त्यावर लगेच संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि प्रशासनाशी संपर्क साधून त्या लगेच सोडवल्या जातील. आज काल धकाधकीच्या जीवनात नागरिकांना प्रत्यक्ष नगरसेवकांची भेट घेण्यास वेळ मिळत नाही. तर अनेक वेळा नगरसेवक विविध कामांसाठी बाहेर असतो त्यामुळे नागरिकांना घर बसल्या आपल्या समस्या या क्यू आर कोडच्या माध्यमातून डिजिटल स्वरुपात मांडल्यावर त्याची आम्ही त्वरित दखल घेऊन त्या समस्या सोडवणार असल्याची माहिती नगरसेविका श्रद्धा जाधव यांनी दिली
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
24 SEPT TO 30 SEPT 2026...
- 24 September, 2026
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant