शेअर बाजारात भीषण भूकंप! इराण-अमेरिका युद्धाच्या सावटाखाली बाजार ‘रक्तबंबाळ
शेअर बाजारात भीषण भूकंप! इराण-अमेरिका युद्धाच्या सावटाखाली बाजार ‘रक्तबंबाळ
भारतीय शेअर बाजारासाठी आजचा गुरुवार ‘ब्लॅक थर्सडे’ ठरला. आज बाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली. सकाळच्या सत्रात स्थिर वाटणारा बाजार दुपारनंतर अक्षरशः पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला. सेन्सेक्स १४०० अंकांपेक्षा जास्त गडगडला निफ्टीने २५,४०० चा महत्त्वाचा आधार (Support Level) तोडला आहे. या मोठ्या पडझडीमुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले. व गुंतवणूकदारांमध्ये घबराट पसरली.
बाजाराला रसातळाला नेणारे ५ मुख्य फॅक्टर्स खालीलप्रमाणे आहेत:
१. अमेरिका-इराण युद्धाची टांगती तलवार
जागतिक पातळीवर भू-राजकीय तणाव कमालीचा वाढला आहे. एका आंतरराष्ट्रीय अहवालानुसार, अमेरिका या आठवड्याअखेर इराणवर लष्करी हल्ला करण्याची शक्यता आहे. हा संघर्ष दीर्घकाळ चालण्याची भीती असल्याने जागतिक गुंतवणूकदारांमध्ये घबराट पसरली. आणि युद्धाच्या या भीतीमुळेच सुरक्षित गुंतवणूक म्हणून अनेकांनी शेअर्स विकून पैसा काढून घेण्यास सुरुवात केली.
२. निफ्टी २५,४०० खाली
तांत्रिक दृष्टिकोनातून (Technical Analysis) २५,४०० ही निफ्टीसाठी अत्यंत महत्त्वाची आधार पातळी होती. हा स्तर तुटल्यामुळे ‘पॅनिक सेलिंग’ (Panic Selling) सुरू झाली आहे.पुढील महत्त्वाचा आधार २५,२०० च्या आसपास दिसत आहे.
३. India VIX मध्ये ८% पेक्षा मोठी झेप
बाजारातील भीती मोजणारा निर्देशांक ‘India VIX’ आज ८% पेक्षा जास्त वाढून १३.२० च्या पार गेला आहे. जेव्हा हा निर्देशांक वेगाने वाढतो, तेव्हा बाजारात मोठी अस्थिरता येते. आज सेन्सेक्सच्या एक्स्पायरीचा दिवस असल्याने ही अस्थिरता अधिकच जाणवली.
४. कच्च्या तेलाचा भडका ($७० पार)
तेलाच्या जागतिक किमतीत ४ ते ५ टक्क्यांची वाढ झाली आहे. ब्रेंट क्रूड $७० प्रति बॅरलच्या वर गेल्याने भारताचा व्यापार तुटीचा (Trade Deficit) ताण वाढला आहे. तेल महागल्यास महागाई वाढेल आणि आरबीआय व्याजदर कपात करण्यास उशीर करेल, या चिंतेने बाजारात विक्रीचा दबाव वाढला.
५. बँकिंग आणि हेवीवेट शेअर्समध्ये पडझड
बँकिंग निर्देशांकाला आज मोठा तडाखा बसला. कोटक बँक, ॲक्सिस बँक आणि इंडसइंड बँक यांसारख्या दिग्गज बँकांच्या शेअर्समध्ये १.५% ते २% पर्यंतची घसरण झाली आहे. रिलायन्स आणि एम अँड एम सारख्या हेवीवेट शेअर्सनीही बाजाराला खाली खेचण्यात मोठी भूमिका बजावली.
आजची घसरण ही केवळ घरगुती कारणांमुळे नसून जागतिक तणावाचा परिणाम आहे. जोपर्यंत युद्धाच्या बातम्यांबाबत स्पष्टता येत नाही, तोपर्यंत बाजारात अशीच अस्थिरता कायम राहण्याची शक्यता आहे.
लेखक शेअर बाजार, अर्थविषयक घडामोडी, सायबर कायदा तसेच डेटा प्रोटेक्शन कायदा तज्ज्ञ आहेत.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant