Breaking News
ठाणे जिल्ह्यातील या शहरात लवकरच सुरु होणार ‘पॉड टॅक्सी’ सेवा
ठाणे - मीरा-भाईंदर शहरात लवकरच पॉड टॅक्सी सेवा सुरू होणार आहे. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्याची शक्यता आहे. पॉड टॅक्सी एलिवेटेड ट्रॅकवर धावणार असल्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीचा अडथळा टाळता येईल. यामुळे वेग, सुरक्षा आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रगत वाहतूक प्रणालीचे नियोजन न्यूट्रॉन ईवी (Neutron EV) या कंपनीच्या सहकार्याने केले जात आहे. कंपनीने एप्रिल महिन्यापासूनच मीरा-भाईंदरमध्ये सर्वेक्षण सुरू केले आहे. नुकताच या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आला.
सरनाईक म्हणाले, “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मीरा-भाईंदरच्या सर्वांगीण विकासासाठी 1,800 कोटींच्या विकास प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे. यापैकी 900 कोटी रुपये फक्त रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी आहेत. याच प्रकल्पांच्या अनुषंगाने आज मीरा-भाईंदर महानगरपालिका (MBMC) मुख्यालयात एक महत्त्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत पॉड टॅक्सी प्रकल्पासह 26 प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.”
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर