पुणे शहरात डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त ‘नो डीजे’ मिरवणूक
पुणे शहरात डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त ‘नो डीजे’ मिरवणूक
पुणे -: १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती साजरी करण्यात येणार आहे. दरवर्षी या निमित्ताने डीजे सह मोठ्या जल्लोषात राज्यभर मिरवणूका काढल्या जातात. मात्र यावर्षी ऐतिहासिक निर्णय घेत पुणे शहरात यंदा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ‘नो डीजे’ म्हणून साजरी केली जाणार आहे. पुण्यातील प्रमुख दलित संघटना, उत्सव समिती, कार्यकर्ते आणि तब्बल ४० विविध संघटना-मंडळांनी मिळून हा निर्णय घेतला आहे. भीमसेवा प्रतिष्ठान आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी गेल्या २५ वर्षांपासून सुरू असलेली स्पीकरची डीजेची परंपरा यंदा कायमची बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान राज्यातील सर्वच शहरांमध्ये या वर्षापासून बाबासाहेबांची जयंती डीजे आणि लेझरमुक्त साजरी करण्यासाठी पोलिसांनी सर्व भीमबांधवांना आवाहन केलं आहे. डॉ. बाबासाहेबांच्या जयंती मिरवणुकीत नियमांचं उल्लंघन करून डीजे किंवा लेझरचा वापर केल्यास गुन्हे दाखळ केले जातील असा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर