पु. ल. देशपांडे अकादमीत रंगणार स्त्री गझलकारांचा गझल मुशायरा
पु. ल. देशपांडे अकादमीत रंगणार स्त्री गझलकारांचा गझल मुशायरा
मुंबई - गझलसम्राट सुरेश भट यांच्या जयंतीनिमित्त अभंग क्रीएटिव्ह, पार्थ थिएटर प्रस्तुत आणि सिनेरंग फाऊंडेशनच्या वतीने स्त्री गझलकारांचा ‘गझल माझी सखी’ या मराठी गझल मुशायरा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम गुरुवार, १६ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी लघू नाट्यगृह, तिसरा मजला, प्रभादेवी, मुंबई येथे रंगणार आहे.
यावेळी खान्देशातील ज्योत्सना राजपूत, पनवेलमधील सुनिता रामचंद्र, पंढरपूरमधील राधिका फराटे, रत्नागिरीतील श्रद्धा खानविलकर, वसईतील स्वाती शुक्ल या गझलकार सादर करणार आहेत. या कार्यक्रमात प्रवेश विनामूल्य असून पहिल्या तीन रांगा राखीव असणार आहेत. या कार्यक्रमासाठी स्काय रुट मीडिया आणि मीडिया माईंड क्रिएशन यांनी विशेष सहकार्य केले आहे. अधिक माहितीसाठी ९५९४०७०९६६ /९९३०५५३३१८ या क्रमांकावर संपर्क साधावा.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर